मंगळवेढा बाजार समिती शेतकऱ्यांसाठी टोमॅटो व बेदाणा सौदे करणार सूरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आजपासून (ता. 19) सुरू करण्यात आलेल्या लिंबू सौदे लिलावाचे उद्‌घाटन बाजार समितीच्या भाजीपाला आवारात सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते झाले. उपसभापती प्रकाश जुंदळे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. लिंबू सौदे लिलाव आठवड्यातील दर सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी होणार आहेत. तसेच ता. 15 जुलैपासून टोमॅटो सौदे लिलाव सुरू होणार आहेत. 

मंगळवेढा(सोलापूर)ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत लिंबु सौदे प्रमाणेच टोमॅटो सौदे व बेदाणा सौदे सुरू करणार आहे. जनावरांचा बाजार देखील सुरू होणार आहे. शेतीमाल स्वच्छ करण्यासाठी धान्य चाळण उभी केली जाणार आहे. या नव्या योजनामूळे परिसरातील शेतकऱ्यांना अधिक चांगले मार्केट उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न चालवला जात आहे. 

हेही वाचाः अध्यापनाची जबाबदारी आता पालकावर, स्वयंअध्ययनावर असेल भर 

कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आजपासून (ता. 19) सुरू करण्यात आलेल्या लिंबू सौदे लिलावाचे उद्‌घाटन बाजार समितीच्या भाजीपाला आवारात सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते झाले. उपसभापती प्रकाश जुंदळे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. लिंबू सौदे लिलाव आठवड्यातील दर सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी होणार आहेत. तसेच ता. 15 जुलैपासून टोमॅटो सौदे लिलाव सुरू होणार आहेत. 

हेही वाचाः साखर कारखानदारी वाचवण्यासाठी साखरेचे आधारभुत किमंत वाढवावी 

त्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून ई-नाम प्रणाली अंतर्गत ऑनलाइन सौदे लिलाव सुरू करण्यात आले. यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच देशातील अन्य भागांतील व्यापारी ऑनलाइन बोली लावण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगले दर मिळू लागले आहेत. बाजार समितीला केंद्र शासनाकडील अनुदान प्राप्त होणार आहे. या अनुदान रकमेतून पुढील चार महिन्यांत धान्य चाळण उभी केली जाईल. भविष्यकाळात संचालक मंडळाने बाजार समितीत बेदाणा सौदे लिलाव व जनावरांचा बाजार भरविण्याचे नियोजन चालू केले आहे. याबरोबरच बाजार समितीचे लक्ष्मी दहिवडी व नंदेश्‍वर या ठिकाणी उपबाजार आवारात विविध विकासकामे करण्यात येतील. 

नविन सुविधा देण्याचा प्रयत्न 
संचालक मंडळ निवडून आल्यापासून भाजीपाला, अडत व्यापारी यांना अडत गाळे दिले आहेत. नवीन डाळिंब सेलहॉल, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कांदा सौदे, डाळिंब सौदे लिलाव आदी बाबी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून केल्या आहेत.

- सोमनाथ आवताडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mangalvedha market starting tomato and raisins markets