सांगोल्यात भाजपचे कर्जमाफी करा, द्या पीककर्ज आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 25 जून 2020

खरीप हंगामात कागदावरच राहिलेली कर्जमाफी आणि पीक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांचा बॅंकात वारंवार होत असलेला अपमानामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. संकटकाळात भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन असून कर्जमाफीचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केला आहे. 

सांगोला(सोलापूर): कर्जमाफी व पीक कर्जाच्या मागणीसाठी येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करा कर्जमाफी, द्या पीककर्ज आंदोलन गुरुवारी (ता. 25) रोजी तहसील समोर आंदोलन केले. 

हेही वाचाः ब्रेकींगः पंतप्रधान मोदीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असे कोण म्हणालेः वाचा सविस्तर 

खरीप हंगामात कागदावरच राहिलेली कर्जमाफी आणि पीक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांचा बॅंकात वारंवार होत असलेला अपमानामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. संकटकाळात भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन असून कर्जमाफीचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी केला आहे. 

हेही वाचाः सोलापूरकरांनो शिस्त पाळा अन्यथा, लॉकडाउन 

कोरोना काळात सर्वांच्या पोटाची खळगी भरणारा शेतकरी आज खरीप पीक कर्जासाठी आस लावून बसला आहे. या शेतकऱ्याकरिता सरकारने कर्ज काढून पैसा उभारावा. परंतु शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे. या मागणीसाठी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नगरसेवक आनंदा माने, शिवाजीराव गायकवाड, गजानन भाकरे, अभिजित नलवडे, संजय केदार, उमेश मंडले, डॉ. मानस कमलापूरकर, संग्राम गायकवाड, अफझल शेख, वामनराव देशमुख, तानाजी कांबळे, लक्ष्मीकांत लिगाडे, विलास व्हनमाने, शीतल लादे, वैजयंती देशपांडे आदी उपस्थित होते. 
भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. दोन लाखांवरच्या कर्जासाठी ओटीएस लागू करू असे सांगितले. नियमित कर्ज भरणाऱ्याना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देऊ असे सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी तर तीन महिन्यांत कर्जमाफी दिली नाही तर नाव बदलू अशी घोषणा केली. अनेक मंत्र्यांनी अभिनंदनाचे भाषण केली. मात्र, सहा महिने झाले तरी 18 लाख शेतकऱ्यांच्या नावाची यादीच आली नाही असे त्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forgive BJP's debt in Sangola, give peak debt movement