dudh.jpg
dudh.jpg

दूध दरवाढीसाठी मोफत दूध वाटप आंदोलनाची माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली घोषणा

पंढरपूर(सोलापूर) ः दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाला योग्य दर मिळावा या मागणीसाठी 1 ऑगस्ट पासून सरकार विरोधात मोफत दूध वाटप आंदोलन केले जाणार असल्याचे माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घोषणा केली आहे. 

येथील विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्य सरकावर टीकास्त्र सोडले. 

यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, राज्य सरकारने सध्या राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्याचा घाट घातला आहे. यामध्ये केवळ राजकीय स्वार्थ आहे. गावातील एका .योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी योग्य व्यक्तीची निवड करताना कोणत्या थर्मामीटरचा शोध लावला आहे, असा उपरोधीक टोलाही लगावला. सरकारने प्रशासकाची नियुक्ती न करता आहे त्याच सरपंचाना मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली. 
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दूध दरवाढीचे केवळ आश्वासन दिले आहे. त्यानंतर शासनाने ठोस असे काहीच शेतकऱ्यांच्या पदरात टाकले नाही. दूधाला योग्य दर मिळावा यासाठी 1 ऑगस्ट पासून राज्यभरात रयत क्रांती संघटनेच्या वतीने दूध दरवाढ आंदोलन केले जाईल.यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले,कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रा. सुहास पाटील, छगन पवार आदी उपस्थित होते. 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com