esakal | केवळ "या' कारणासाठी नोकराचा खून; सिद्धापूर येथील दुकान मालक भावांविरुद्ध गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

सिद्धापूर (ता. मंगळवेढा) येथील संतोष कोळी (वय 22) हा बिराजदार यांच्या फोटो स्टुडिओच्या दुकानामध्ये कामाला होता. मलकप्पा मल्लाप्पा बिराजदार व म्हांतेश मल्लाप्पा बिराजदार या दोघा भावांनी संतोष कोळी यास 12 जुलै रोजी रात्री घरातून बोलावून विषारी शिंदी पाजली. त्यानंतर त्याला संतोष सोनगे यांच्या शेतामध्ये घेऊन गेले. दोघा भावांनी मिळून संतोषला दुकानाची चावी मागितली. त्याने पगार दिल्याशिवाय चावी देत नाही, असे म्हटल्यानंतर संतोषला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. 

केवळ "या' कारणासाठी नोकराचा खून; सिद्धापूर येथील दुकान मालक भावांविरुद्ध गुन्हा दाखल 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : पगार देण्याच्या कारणावरून नोकरास विषारी शिंदी पाजली व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून खून केल्याप्रकरणी तालुक्‍यातील सिद्धापूर येथील दुकान मालक असलेल्या दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : गट-तट आणि व्यक्तिकेंद्रित राजकारणाला अजिबात थारा नाही, असे कोण म्हणाले? ते वाचा 

या प्रकरणाची फिर्याद मृताचे वडील महादेव कोळी (वय 40) यांनी पोलिसांत दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, की महादेव कोळी यांचा मुलगा संतोष कोळी (वय 22) हा बिराजदार यांच्या फोटो स्टुडिओच्या दुकानामध्ये कामाला होता. मलकप्पा मल्लाप्पा बिराजदार व म्हांतेश मल्लाप्पा बिराजदार या दोघा भावांनी संतोष कोळी यास 12 जुलै रोजी रात्री घरातून बोलावून विषारी शिंदी पाजली. त्यानंतर त्याला संतोष सोनगे यांच्या शेतामध्ये घेऊन गेले. दोघा भावांनी मिळून संतोषला दुकानाची चावी मागितली. त्याने पगार दिल्याशिवाय चावी देत नाही, असे म्हटल्यानंतर संतोषला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे करीत आहेत. 

हेही वाचा : सोन्याचे अंडे विकायचे सोडून सरकार निघालंय सोन्याचे अंडे देणारी कोंबडी विकायला! कोणी केली मोदी सरकारवर टीका? वाचा 

याबाबत आदिवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोळी म्हणाले, या प्रकरणात सुरवातीला अकस्मात म्हणून पोलिसांत नोंद दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण खुनाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करावा, खून प्रकरणातील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी मी आदिवासी या संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले होते. पोलिसांनी अखेर या प्रकरणी आज खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल