कॉंग्रेस, शिवसेना व भाजपमध्ये फिरलेले जयवंतराव जगताप आता राष्ट्रवादीच्या प्रेमात !

अण्णा काळे 
Saturday, 8 August 2020

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले, की आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली. यापूर्वी माझी पवार यांच्याबरोबर दोन वेळा फोनवर चर्चा झाली होती. या वेळी भेटण्याचे ठरले होते. पवार यांच्या भेटीत संपूर्ण तालुक्‍याच्या घडामोडींवर चर्चा झाली. माझे वडील (कै.) नामदेवराव जगताप यांच्यापासून शरद पवार यांचे आणि आमचे संबंध आहेत. श्री. पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आजही आहे. यापुढेही त्यांच्याच विचाराने राजकारण करणार आहे. 

करमाळा (सोलापूर) : करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज गोविंदबाग (बारामती) येथे भेट घेतली. या भेटीमुळे तालुक्‍यात राजकीय चर्चा रंगली आहे. माजी आमदार जगताप यांनी नेमकी ही भेट कशासाठी घेतली? जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत की काय? याविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा प्रचार केला होता. या वेळी त्यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. तर विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांचा प्रचार केला होता. त्यामुळे पवार-जगताप भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

हेही वाचा : कोरोनाची लस कधी येणार..? महसूलमंत्री थोरात म्हणाले, डब्ल्यूएचओला सांगता येइना मग मी कसं सांगू? 

याबाबत माहिती देताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले, की आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली. यापूर्वी माझी पवार यांच्याबरोबर दोन वेळा फोनवर चर्चा झाली होती. या वेळी भेटण्याचे ठरले होते. पवार यांच्या भेटीत संपूर्ण तालुक्‍याच्या घडामोडींवर चर्चा झाली. माझे वडील (कै.) नामदेवराव जगताप यांच्यापासून शरद पवार यांचे आणि आमचे संबंध आहेत. श्री. पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आजही आहे. यापुढेही त्यांच्याच विचाराने राजकारण करणार आहे. 

हेही वाचा : पोलिस आयुक्त म्हणाले, जिल्हाबंदीचे आदेश अद्याप लागू, ई-पास अनिवार्यच 

भविष्यात कृतीतूनच याचे रिझल्ट दिसतील 
जयवंतराव जगताप म्हणाले, शरद पवारांचे व माझे भावनिक नाते आहे. ते मला पितृतुल्य आहेत. त्यांची सदिच्छा भेट मी घेतली. नामदेवराव जगताप यांच्यापासून पवार यांचे व आमचे ऋणानुबंध आहेत. पवार यांच्याशी तालुक्‍यासह जिल्ह्याच्या राजकीय व विकासात्मक बाबींवर चर्चा झाली. भविष्यात कृतीतूनच याचे रिझल्ट दिसतील. मधल्या काळात काही स्थानिक राजकीय मतभिन्नतेमुळे मी त्यांच्यापासून दूर असलो तरी भावनिक व वैचारिकदृष्ट्या आम्ही कधीच विभक्त झालो नव्हतो अथवा त्यांच्यावरील माझी श्रद्धा व त्यांचे देखील माझ्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही वा होण्याचे काहीच कारण नाही. तालुक्‍याच्या विकासाच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ठामपणे पाठीशी राहण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले आहे . 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Jayawantrao Jagtap called on Sharad Pawar