या तालुक्याच्या माजी आमदारांनी केली तूर, उडीद, मका हमीभाव केंद्राची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

tur dal
tur dal

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामात तूर, उडीद, मका, मूग या पिकांची मोठ्याप्रमाणावर पेरणी केली आहे. त्यामुळे यावर्षी तुर, उदीडचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होणार आहे. शेतक-यांच्या तुरी, उडीद, मक्याला योग्य भाव मिळण्यासाठी व शेतक-यांची अर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाने करमाळा तालुक्यात तुर ,उडीद व मका खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र सुरू करावीत अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.

जर वेळेत हमीभाव केंद्र सुरू झाली नाहीत तर आनंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे. हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंञी उध्दव ठाकरे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंञी शंभुराजे देसाई, कृषीमंञी दादा भुसे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा विधानसभा मतदारसंघात शेतकर्‍यांनी हजारो हेक्टरमध्ये तूर, उडीद, मूग या खरीप पिकांची लागवड केलेली आहे. तूर पिकाचा हमीभाव शासन दफ्तरी रक्कम रुपये ५८०० आहे. माञ व्यापारी शेतकर्‍यांची तुर चार हजाराच्या पुढे खरेदी करत नाहीत, त्यामुळे शेतक-यांना मोठा रूपयांचा आर्थिक फटका बसत आहे. 

प्रत्येक वर्षी शेतमालाबाबत हमीभाव जाहीर करायचा पण त्या भावाने माल खरेदी करण्याबाबत दिरंगाई केली जाते. ही दिरंगाई व्यापार्‍यांच्या पथ्यावर पडत आहे. गतवर्षी हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने तूर, उडीद, हरभरा, मका, मूग या पिकांवर शेतकर्‍यांनी केलेला उत्पादन खर्चही निघालेला नाही. गेल्यावर्षी शेतकर्‍यांची तूर व्यापार्‍यांनी चार हजार ते चार हजार ४०० रुपये एवढ्या मातीमोल कमी दराने खरेदी केली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचा तूर पिकांसाठी लागवड पूर्व जमिनीची मशागत, बियाणे, खते, किटकनाशक फवारणी, मळणी आदीवर होणारा खर्च उत्पादीत मालाच्या विक्रीतून येणार्‍या पट्टीपेक्षाही जास्त होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये कमालीची नाराजी व अस्वस्थता आहे. त्यामुळे शासनाने खरीप तूर, उडीद, मूग पिकांच्या मालासाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.       

करमाळ्यातील माजी आमदार नारायण पाटील म्हणाले, यावर्षी करमाळा तालुक्यात तूर - 14,388 हेक्टर, उडीद- 13,819 हेक्टर,मूग - 2819 हेक्टर, मका - 7207 हेक्टर ऐवढ्या क्षेञावर पेरणी झाली आहे. करमाळा तालुक्यात पहिल्या 13 हजार 819 ऐवढ्या मोठ्या प्रमाणात उडदाची पेरणी झाली आहे. शिवाय वेळेवर पाऊसही झाला आहे. गेल्यावर्षी कोणत्याही हमीभाव केंद्र सुरू केले नाही. परीणामी शेतक-यांचे नुकसान झाले. यावर्षी वेळेत हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी वेळेत व्हावी, यासाठी बाजारात तुर, उडीद, मका विक्रीसाठी येण्यास वेळ आहे. त्यापूर्वीच आपण मागणी करत आहोत. करमाळा तालुक्यात हमीभाव केंद्र सुरू झाली नाहीत तर वेळेप्रसंगी आपण रस्त्यावर उतरू. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com