
यावेळी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणचे काम थांबण्याच्या सूचना दिल्या.
मंगळवेढा (सोलापूर) : रत्नागिरी नागपूर या महामार्गावर तालुक्यात दोन ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, या मागणीसाठी मतदारसंघाच्या आजी-माजी खासदारांनी लक्ष घातले. याबाबत त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणीदेखील केली आहे. त्यामुळे या मागणीची दखल पर्यटन मंत्री घेणार का? असा सवाल तालुक्यातील नागरिकातून व्यक्त केला जात आहे.
माचणूर येथील मुख्य चौकात उड्डाणपूल न करता मुख्य चौकापासून काही अंतरावर करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संबंधित ठेकेदाराने ते काम करण्याचा प्रयत्न केला. तेथील ग्रामस्थांनी खा.जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे मुख्य चौकात उड्डाणपूल करावा. जेणेकरून रहाटेवाडी, तामदर्डी, बोराळे, शालेय विद्यार्थी व माचणूर येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी दक्षिण भागात असल्यामुळे त्यांना सोयीचे होण्याच्या दृष्टीने मुख्य चौकात उड्डाणपूल करावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
यावेळी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणचे काम थांबण्याच्या सूचना दिल्या. त्याबाबतची वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वी बोराळे, अरळी सिद्धापूर, मुंढेवाडी या गावासह मंगळवेढ्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमीन पुर्व भागात असून उड्डाणपूल नसल्यामुळे त्यांना चार कि.मी अंतर जास्तीचे कापावे लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करावे, यासाठीची मागणीचे निवेदन मा.खा. सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आले. त्यांनी या प्रश्नी लक्ष घातले असून त्यांनी बोराळेकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल करावे, या मागणीचे निवेदन वाहतूक मंत्री गडकरीना दिले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दोन वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाणपूल करावे. या मागणीचे निवेदन सोलापूरच्या आजी-माजी खासदारानी केंद्रीय वाहतूक मंत्री यांना दिले असले तरी तालुक्यातील महामार्गाचे काम सध्या पूर्णत्वाकडे जात आहे. या मागणीची दखल कधी घेणार याची चर्चा मंगळवेढ्यात होत असताना सदर कामाचे सर्वेक्षण करत असताना संबंधित सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी उड्डाणपूल करण्याबाबतची गोष्ट का लक्षात आली नाही? हा देखील प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.