समुपदेशन हवंय तर या क्रमांकावर करा कॉल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) व सोलापूर इंडियन मानसोपचार शाखा (एसपीएस) एकत्र आल्या आहेत. त्यांनी एकत्र येऊन सोलापूरकरांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील नागरिकांना हे मानसोपचार तज्ञ विनामूल्य समुपदेशन करणार आहेत. याबाबतची माहिती आज "आयएमए'चे अध्यक्ष डॉ. हरीश रायचूर व "एसपीएस'चे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) व सोलापूर इंडियन मानसोपचार शाखा (एसपीएस) एकत्र आल्या आहेत. त्यांनी एकत्र येऊन सोलापूरकरांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील नागरिकांना हे मानसोपचार तज्ञ विनामूल्य समुपदेशन करणार आहेत. याबाबतची माहिती आज "आयएमए'चे अध्यक्ष डॉ. हरीश रायचूर व "एसपीएस'चे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोनामुळे अनेक देशांतील नागरिकांची झोप उडाली आहे. आपल्या देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संचारबंदी असल्यामुळे घरातून बाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. लहान मुले घाबरून गेली आहेत. ती रात्रीच्या वेळी झोपतही नाहीत. त्यामुळे लोकांना जर मानसिक समुपदेशनाची गरज असेल तर त्यांना हे समुपदेशन मोफत करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतल्याचेही यावेळी सांगितले. डॉक्‍टरांचे समुपदेशन झाल्यास भविष्यात मानसिक रुग्ण होण्यापासून बचाव होणार आहे. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर चांगले काम चालू आहे. अहोरात्र डॉक्‍टर, नर्स, सामाजिक संस्था, कार्यकर्ते काम करत आहेत. या आजाराविषयी अनेकांच्या मनात शंका आहेत. पण, त्या शंकांचे निराकरण ही तज्ञ मानसोपचार मंडळी करणार आहेत. या आजाराची लक्षणे सर्दी, ताप यासारखी आहेत. यामुळे थोडाजरी ताप आला, थकवा वाटू लागला तरी लोक घाबरून जाऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ञ नागरिकांना फोनद्वारे मोफत समुपदेशन करणार आहेत. डॉक्‍टरांची ही विनामूल्य समुपदेशन सेवा ही सकाळी साडेदहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी डॉ. संपदा अन्वेकर, डॉ. विष्णूपंत गावडे, डॉ. निहार बुरटे उपस्थित होते. 

डॉक्‍टरांचे नाव, मोबाईल नंबर व फोन करण्याची वेळ या क्रमाने 
डॉ. श्रीकांत पाटणकर-9422065516, डॉ. संपदा अन्वेकर-7666068634 सकाळी-साडेदहा ते बारा डॉ. अर्चना कुलकर्णी-0217-2311727, डॉ. विनायक राऊत-9850040023 दुपारी बारा ते दीड, डॉ. श्रीनिवास चौधरी-9822497171, डॉ. विष्णूपंत गावडे-9423065116 दुपारी दीड ते तीन, डॉ. प्रसन्न खटावकर-9326813048, डॉ. रुजुजा उत्पात-8080138055, डॉ. नितीन भोगे-9923964567 दुपारी तीन ते साडेचार, डॉ. गंगाधर कोरके-9860075975, डॉ. हर्शल थडसरे-9890149720, डॉ. महेश देवकते-8805411716 दुपारी साडेचार ते सहा, डॉ. प्रभाकर होळीकट्टी-7841902426, डॉ. निहार बुरटे-8080498509 सायंकाळी सहा ते साडेसात, डॉ. संतोष बिनवडे-9970608383, डॉ. तेजस भोपटकर-8605605997 सायंकाळी साडेसात ते रात्री नऊ, डॉ. सरताज बागवान-9920734047 रात्री नऊ ते दहा 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free consultation by a doctor in Solapur