बार्शीत श्रीराम जन्मभूमी निधी संकलनास प्रारंभ ; पहिल्याच दिवशी सव्वासात लाखांचा निधी जमा

प्रशांत काळे 
Sunday, 3 January 2021

अयोध्या येथे भगवान प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामध्ये आपलाही सहभाग असावा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे.

बार्शी (सोलापूर) : अयोध्या येथे भगवान प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामध्ये आपलाही सहभाग असावा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्याला अनुसरुनच येथील श्री भगवंत देवस्थान ट्रस्टने रुपये 1 लाख 11 हजार 111, महावीर भास्कर कदम यांनी 1 लाख 11 हजार 111, श्री योगीराज वेद विज्ञान आश्रम, कासारवाडीचे योगेश नारायण काळे यांनी 1 लाख, अनिल बंडेवार 1 लाख, डॉ. योगेश सोमणी 1 लाख, माजी खासदार शिवाजी कांबळे 1 लाख असे 7 लाख 25 हजार पहिल्याच दिवशी भगवंत मंदिरात छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात जमा झाले. दानशुरांचा मंदिरात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन भगवंत देवस्थान ट्रस्टचे सरपंच दादासाहेब बुडूख, विश्वस्त मुकुंद कुलकर्णी, नानासाहेब सुरवसे यांनी केले.
 
हे ही वाचा : पंढरीत डॉक्टर मित्राचा डॉक्टरला 'आधार'! दरोडेखोरांच्या थरारात दिला दिलासा

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह मोहन श्रीरामे, सहकार्यवाह तुषार महाजन, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलन समितीचे विभाग संयोजक सतीश आरगडे, तालुका निधी प्रमुख आनंद सोमाणी, राजेंद्र शिंदे, अनिल खजानदार, पी. व्ही. कुलकर्णी, सुरेश हालमे, जितेंद्र मोरे, सुधाकर नारकर, मनोज बडवे, ऋषिकेश कुलकर्णी, प्रा. किरण देशमुख, तात्या घावटे, सूर्यकांत देशमुख, अजय आरगडे, अभिषेक खाडे आदी उपस्थित होते. 

हे ही वाचा : Gram Panchayat Election : वाळूजकडे लक्ष ! राष्ट्रवादीच्याच दोन गटांत रंगणार सामना? उद्या होणार चित्र स्पष्ट

यानंतर संघाच्या समर्थ व्यायामशाळेतील कार्यालयात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी समर्पण कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. दोन टप्प्यात निधी संकलनाचे काम होणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fundraising for Shri Ram Janmabhoomi has started in Barshi