मुंबईत निधन झाले, मृतदेह ताब्यात न मिळाल्यामुळे... 

Funeral of Bhagwanrao Krishnaji Shinde in Bittergaon Shri
Funeral of Bhagwanrao Krishnaji Shinde in Bittergaon Shri

सोलापूर : बिटरगाव (श्री) (करमाळा) येथील भगवानराव शिंदे यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा मृतदेह ताब्यात न मिळाल्याने मूळगावी मोजक्‍याच नातेवाइकांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात अंत्यविधी करून त्यांचे अंतिम दर्शन घेण्यात आले. शिंदे यांचा मुलगा ऍड. हिंदराज हे मुंबईला सर्वोच्च न्यायालयात असतात. लॉकडाउनच्याआधी ते मुंबईला गेले होते. उपचारादरम्यान त्यांचे रुग्णालयात निधन झाले. 
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सध्या देशासह महाराष्ट्रात लॉकडाउन सुरु आहे. यामुळे मुंबई, पुणेसह इतर जिल्ह्यांतून येण्यासाठी नागरिकांना परवानगी काढावी लागत आहे. शिंदे यांचे बिटरगाव (श्री) हे मूळगाव आहे. त्यांचा एक मुलगा मनीष हे गावात शेती पाहतात. तर दुसरा मुलगा मुंबईत सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. त्यांना चार मुली आहेत. करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांचे ते सासरे होते. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, त्यांचे निधन झाले. लॉकडाउनमुळे त्यांचा मृतदेह त्यांच्या मूळगावी आणता आला नाही. मात्र, नातेवाईक आणि गावातील नागरिकांत त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात होती. त्यामुळे नातेवाईक आणि काही नागरिकांनी प्रातिनिधिक अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी सर्व धार्मिक विधी करण्यात आल्या. या अंत्यविधीला मोजके नागरिक व गावातील काही नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत उपस्थित होते. शिंदे हे देशभक्त (कै.) नामदेवराव जगताप यांचे सहकारी होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. याबरोबर तालुक्‍यातील इतर संस्थांमध्येही काम पाहिले. बिटरगाव (श्री)चे ते 35 वर्षे सरपंच होते. गावातील अनेकांचे संसार त्यांनी उभे केले आहेत. गरजूंना मदत करण्यात ते नेहमी आघाडीवर होते. करमाळा तालुक्‍यात त्यांचे मोठे नाव होते. 

असा झाला विधी 
शिंदे यांचा लॉकडाउनमुळे मृतदेह आणण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, त्यांचे अंत्यदर्शन व्हावे म्हणून प्रातिनिधिक अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपस्थितांनी विचारविनिमय करून अंत्यविधी करण्याचा वेळ ठरवला. त्यानुसार सायंकाळचा वेळ देण्यात आला. या वेळी मोजक्‍याच लोकांनी उपस्थित राहवे, असेही कळवण्यात आले. त्यानुसार त्यांच्या शेतात धार्मिक विधी करत अंत्यविधी पार पडला. हा विधी इतर नातेवाइकांना पाहाता यावा म्हणून व्हिडिओ कॉल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com