गुड न्यूजः अक्कलकोट झाले कोरोनामुक्त 

hospital.jpg
hospital.jpg

अक्कलकोट(सोलापूर)ः येथील कोरोना बाधित आढळलेल्या सात कोरोना रुग्णांपैकी अक्कलकोटला उपचार घेत असलेले सहा जण पूर्ण बरे झाल्याने त्यांना आज सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता घरी सोडण्यात आले. तर उर्वरित एक रुग्णावर सोलापुरात उपचार चालू होते त्यांना ही आज रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. 

दरम्यान आज अक्कलकोटला कोव्हीड सेंटर येथून उपचाराला प्रतिसाद देऊन ठणठणीत बरे झालेल्या सर्व रुग्णांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना घरी सोडण्यात आले. अक्कलकोटला पहिल्यांदा फरशी व्यापारी मृत झाल्यानंतर त्यांचा तपासणी अहवाल हा कोरोनाबधित आढळला होता. अडीच महिने शांत असलेले अक्कलकोट या प्रकरणाने हादरले होते. त्या मृत रुग्णाच्या संपर्कातुन एकूण सात नवे रुग्ण आढळले होते. 

त्यामुळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी तसेच तहसीलदार अंजली मरोड, मुख्याधिकारी आशा राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी व विजय जाधव तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेड,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड आदींनी केलेल्या सुनियोजीत प्रयत्नामुळे आजच्या घडीला अक्कलकोट कोरोनामुक्त झाले आहे. आता पावसाळा सुरू होत आहे. शासनाने लोकांच्या मागणीनुसार सवलती देत आहे. पण आता खरी जबाबदारी बाजारात वावरणाऱ्या नागरिकांची आहे. कोरोनला सोबत घेऊनच आपली पुढील वाटचाल करावी लागणार हे निश्‍चित असल्याने अधिक सजगता बाळगणे हिताचे ठरणार आहे. सदर रुग्णांना घरी सोडताना तहसीलदार अंजली मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेड,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड,अन्नछञ मंडळ सचिव शामराव मोरे,उपाध्यक्ष अभय खोबरे व आरोग्य खाते व महसूल कर्मचारी उपस्थित होते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com