बळीराजासाठी खुशखबर...'अवकाळी'साठी आणखी एक हजार कोटी 

बळीराजासाठी खुशखबर...'अवकाळी'साठी आणखी एक हजार कोटी 
Updated on

सोलापूर : अवकाळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत सहा हजार 500 कोटींची मदत वितरीत केली आहे. अवकाळीने नुकसान झालेल्या सुमारे 16 लाख 30 हजार शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नसल्याचा अंदाज आहे. त्यानुसार शेतकऱ्यांची यादी व त्यांच्यासाठी लागणारी रक्‍कम 15 दिवसांत कळवा, असे पत्र मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, बीड, नगर, यवतमाळ यासह अन्य बाधित जिल्ह्यांसाठी आणखी एक हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 


मागच्या वर्षीच्या दुष्काळाचा सामना करीत पिकांची जोपासना करणाऱ्या बळीराजाला अवकाळीचा फटका सहन करावा लागला. राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने झाले. त्यांच्यासाठी राज्य सरकारने सात हजार 202 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला. त्यातून केंद्र सरकारने 956 कोटींना मंजुरी दिली असून ही रक्‍कम राज्य सरकारला वितरीत केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार मदतीपासून वंचित राहिलेल्या व पूर्ण मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी व त्यांच्यासाठी लागणारी रक्‍कम कळविण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा स्तरावर माहिती संकलित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मार्चएण्डपर्यंत ही रक्‍कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचेही मदत व पुनवर्सन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी सांगितले. 


अवकाळीसाठी आणखी एक हजार कोटी 
अवकाळीने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांसाठी आणखी किती रक्‍कम लागणार आहे, याची माहिती कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे. माहिती संकलित करण्याचे काम सुरु असून 15 दिवसांत रक्‍कम व शेतकरी संख्या निश्‍चित होईल. त्यानुसार पाचशे ते एक हजार कोटी रुपयांपर्यंत आणखी मदत दिली जाणार आहे. 
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन विभाग, मुंबई 


राज्याची स्थिती 
अवकाळीने बाधित शेतकरी 
1.03 कोटी 
वितरीत मदतीची रक्‍कम 
6,500 कोटी 
मदत न मिळालेले अंदाजित शेतकरी 
16.30 लाख 
वाढीव मदतीचे नियोजन 
1,000 कोटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com