महाविकास आघाडीकडून बळीराजासाठी गुड न्यूज...नक्‍की वाचा 

farmer
farmer
Updated on

सोलापूर : राज्यात नोव्हेंबर 2019 मध्ये 'क्‍यार' व 'महा'चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 349 तालुक्‍यांमधील तब्बल एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले. राज्याच्या आकस्मिकता निधीतून आतापर्यंत साडेचार हजार कोटी वितरीत केले असून आता 750 कोटींची मदत वितरीत करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त बळीराजाला दिलासा मिळाला, परंतु, नाशिक विभागाला दमडाही मिळालेला नाही. कर्जापोटी मदतीची रक्‍कम वसूल करु नये, अशी सूचना सरकारने बॅकांना केली आहे. 

33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच मदत
अवकाळीमुळे शेती पिकांसह बहूवार्षिक पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने 18 नोव्हेंबर 2019 रोजी दोन हजार 59 कोटी 36 लाख 65 हजारांचा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली. सरकारच्या निर्णयानुसार शेती पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्‍टर आठ हजार रुपये (दोन हेक्‍टरपर्यंत) तर बहूवार्षिक पिकांसाठी 18 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मात्र, 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकांनी संयुक्‍तपणे पंचनामे पूर्ण करुन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तो अहवाल विभागीय आयुक्‍तांना पाठविला. कृषी आयुक्‍तांनी राज्याचा अहवाल एकत्रित करुन शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या मदतीचे वाटप करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. 


जिल्हानिहाय मदतीची रक्‍कम 
सोलापूर (पाच कोटी सात लाख 90 हजार), ठाणे (पाच कोटी 18 लाख 27 हजार), पालघर (सात कोटी 96 लाख सात हजार), रायगड (तीन कोटी 60 लाख), सिंधुदूर्ग (तीन कोटी 80 लाख 50 हजार), कोल्हापूर (पाच लाख 24 हजार), औरंगाबाद (65 कोटी 97 लाख 16 हजार), जालना (78 कोटी 37 लाख 43 हजार), बीड (103 कोटी 79 लाख 17 हजार), लातूर (50 कोटी 35 लाख 40 हजार), उस्मानाबाद (32 कोटी 13 लाख 70 हजार), नांदेड (66 कोटी 15 लाख 82 हजार), परभणी (61 कोटी 40 लाख 52 हजार), हिंगोली (31 लाख 75 लाख 97 हजार), बुलढाणा (76 कोटी 21 लाख 74 हजार), अकोला (36 कोटी 79 लाख 46 हजार), वाशिम (17 कोटी 66 लाख 17 हजार), अमरावती (27 लाख 81 लाख 43 हजार), यवतमाळ (57 कोटी 73 लाख 70 हजार), वर्धा (22 लाख 65 हजार), नागपूर (70 कोटी दोन लाख 28 हजार), चंद्रपूर (9 कोटी 86 लाख 81 हजार), गडचिरोली (14 कोटी दोन लाख 61 हजार रुपये).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com