सरकारचा निर्णय - विद्यार्थ्यांसाठी आता करिअर पोर्टल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मुलांना शासनाच्या माध्यमातून जर करिअर विषयी माहिती मिळणार असेल तर ही गोष्ट त्या मुलांसाठी खूप चांगली आहे. शिक्षण कोणते घ्यावे, व्यवसाय कोणता करावा याबाबतची सवर्‌ माहिती मुलांना याच्या माध्यमातून मिळणे सोपे जाणार आहे. 

सोलपूार ः राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने करिअर पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा राज्यातील मुलांना होणार आहे. नोकरी, व्यवसाय मिळविण्यासाठी हे पोरटल फायदेशीर ठरणार आहे.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या पोर्टलचे उदघाटन केले आहे. या पोर्टलच्या सहायाने करिअरविषयी मागर्दशर्न, विविध व्यावसाइक कोसर्ची माहिती, विविध शिष्यवृत्त्या, उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये व विश्वविद्यालये याविषयीची माहिती मुलांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. युनिसेफच्या तांत्रिक सहकायार्ने हे पोर्टल शासनाने सुरु केले आहे. 

दहावी- बारावीनंतर पुढे काय करावे याबाबत मुलांमध्ये संदिग्धता असते. त्यांना योग्य ते मागर्दशर्न मिळत नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक क्षेत्र निवडताना मुलांच्या अनेकवेळा चुका होतात. त्या चुका पुन्हा भरुन निघणे अशक्‍य होते. एकदा झालेली चूक पुन्हा भरुन निघत नसल्यामुळे मुलांचे करिअर बरबाद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मुलांना शासनाच्या माध्यमातून जर करिअर विषयी माहिती मिळणार असेल तर ही गोष्ट त्या मुलांसाठी खूप चांगली आहे. शिक्षण कोणते घ्यावे, व्यवसाय कोणता करावा याबाबतची सवर्‌ माहिती मुलांना याच्या माध्यमातून मिळणे सोपे जाणार आहे. 

शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या हस्ते आज याचे वेबिनारच्या माध्यमातून उदघाटन करण्यात आले. या कायर्क्रमासाठी वेबिनारच्या माध्यमातून राज्यातील माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचायर्, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त यांच्यासह या विभागाचे सचिवही उपस्थित होते. 

फायदा घेणे गरजेचे 
शासन अनेक धोरणात्मक निणर्य घेत असते. ते मुलांच्या फायद्यासाठीच असतात. मात्र, त्याचा फायदा घेण्याकडे दुलर्क्ष होते. पण, करिअरच्या बाबतीत मुलांनी चूक न करता याचा फायदा घेणे आवश्‍यक आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government decision - now career portal for students