अतिवृष्टीग्रस्त पिके व मालमत्तांचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री भरणे यांचे प्रशासनाला आदेश 

चंद्रकांत देवकते 
Saturday, 17 October 2020

सीना नदीला आलेला पूर व अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍यातील बाधित झालेल्या पूरगस्त भागाची पाहणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. या वेळी नुकसान झालेल्या पिकांचे व पडझड झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत असतानाच, खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महावितरणला दिल्या. 

मोहोळ (सोलापूर) : सीना नदीला आलेला पूर व अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍यातील बाधित झालेल्या पूरगस्त भागाची पाहणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील, तहसीलदार जीवन बनसोडे उपस्थित होते. 

पाहणी करत असतानाच नुकसान झालेल्या पिकांचे व पडझड झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत असतानाच, खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महावितरणला दिल्या. मोहोळ तालुक्‍यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे व अतिवृष्टीमुळे सुमारे चाळीस गावांना आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. तर शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांचा मोडका तोडका संसार पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. अशा बाधित झालेल्या गावांपैकी कोळेगाव, आष्टे, अर्जुनसोंड, पोपळी आदी भागातील शेती, वाड्या- वस्ती येथे प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री भरणे यांनी परिस्थितीची पाहणी केली. 

या वेळी घटनास्थळांच्या विदारक दृश्‍याची पाहणी करत असतानाच संबंधित अधिकाऱ्यांना बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या पिकांचे, पडझड झालेल्या घरांसह नागरिकांच्या मालमत्तेच्या नुकसानीचे संपूर्ण पंचनामे करण्याचे आदेश दिले. या वेळी पंचायत समिती सदस्य रामराजे कदम, संतोष पवार, सज्जन पाटील, लक्ष्मण गावडे, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Dattatrey Bharane inspected the flooded area at Mohol