esakal | पालकमंत्री भरणे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

bharne mama

कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न 
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या व कोरोनामुळे मृत पाहणारे व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागाचीही चिंता वाढली आहे. वाढती संख्या व मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकार व जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. 

पालकमंत्री भरणे उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या (शनिवार, ता. 4) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सव्वानऊ वाजता मोहोळ तालुक्‍यातील वडवळ येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम व शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मोहोळचे आमदार यशवंत माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यानंतर पावणेदहा वाजता ते वडवळ येथून सोलापूरकडे रवाना होणार आहेत. 

सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, कोरोनाची स्थिती याबाबतचा आढावा ते घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे.

या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यानंतर दुपारी बारा वाजता पालकमंत्री भरणे यांचे सोलापुरातील सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता सोलापुरातील विश्रामग्रह आतून ते बारामतीकडे रवाना होणार आहेत.