'त्याने' घरीच बनवला सव्वा फुट उंचीचा इकोफ्रेंडली गणपतीबाप्पा !

rushikesh kamble.jpg
rushikesh kamble.jpg

द. सोलापूर (सोलापूर)ः यंदा लॉकडाऊनमुळे "वर्क फ्रॉम होम' निमित्त घरीच असलेल्या अनेकांनी गणेशोत्सवासाठी मूर्ती खरेदी करण्यापेक्षा ती घरीच बनवण्यावर भर दिल्याचे दिसते. अशाच प्रयत्नातून जुळे सोलापूरातील ऋषिकेश कांबळे या हौशी छायाचित्रकाराने शाडूच्या मातीपासून सुमारे सव्वा फुटाचा इकोफ्रेंडली बाप्पा तयार केला आहे. 

शनिवारपासून (ता. 22) गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी बाप्पांचे आगमन यंदा साध्या पध्दतीने मात्र तितक्‍याच उत्साहात होत आहे. गणेश मूर्ती खरेदीची बाजारातील गर्दी लक्षात घेऊन अनेकजण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरीच मूर्ती तयार करत आहेत. विशेष म्हणजे या मूर्ती पर्यावरणपूरक बनवण्यावर अनेकांचा भर आहे. 

जुळे सोलापूर परिसरातील हौशी छायाचित्रकार कांबळे यानेही शाडूच्या मातीपासून कलात्मक पध्दतीने इको फ्रेंडली सुबक गणेशमूर्ती तयार केली आहे. यंदा पहिल्यांदाच त्यांने हा प्रयत्न केला असून आपली गणेशभक्ती त्यामध्ये उतरवली आहे. सुमारे साडेआठ किलो शाडूची माती त्याने यासाठी वापरली आहे. गणेशमूर्ती तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण न घेता त्याने यूट्यूबच्या माध्यमातून ही मूर्ती साकारली आहे. त्याची ही मूर्ती अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ रंगरंगोटी करणे बाकी आहे. ही गणेश मूर्ती पर्यावरण पूरक असल्याने पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. विसर्जनानंतर ही मूर्ती पाण्यामध्ये लगेचच विरघळणारी आहे. त्यामुळे अशा मूर्ती गणेश भक्तांनी बनवल्यास गणेश भक्तीसह पर्यावरणाचा समतोलही राखला जाणार असल्याचे मत कांबळे यांनी व्यक्त केले.  

 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com