विडी घरकुल परिसरात ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबीर 

vvidi gharkul aarogya shibir.jpg
vvidi gharkul aarogya shibir.jpg

दक्षिण सोलापूर(सोलापूर)ः कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोदुताई परूळेकर विडी घरकुलमधील अन्नपुर्णा देवी मंदिर परिसरात आज (ता.30) ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या अरोग्य शिबीरात 108 जणांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी रूग्णांना औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले. 

गोदूताई परूळेकर विडी घरकुलच्या "ब' विभाग क्रमांक एक मधील अन्नपुर्णा देवी नवरात्रोत्सव बहुउद्देशिय संस्थेने फॅमिली प्लॅनिग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या सहाय्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

शिबिराचे उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गोरट्याल यांच्या हस्ते देवीच्या पूजनाने झाले. यावेळी सचिव नागेश बोमडयाल, उपाध्यक्ष रत्नाकर मादम, विश्‍वस्त देविदास बोगम कार्यकर्ते राणा मादास, राजशेखर बुगडे, रमेश वंगा, अभिषेक बारीख, नरसिंग बोमड्याल, फॅमिली प्लॅनिंगचे डॉ. तांबोळी, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी, पॅथॉलॉजी विभागाचे व्यंकटेश कंची, एच.पी.पाल, सुनीता पाटील, शुभांगी नाईकवाडी, करण खानापुरे उपस्थित होते. या शिबिरात 108 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, हात-पाय दुखणे यासह सर्व सामान्य आजारांचा समावेश होता. यावेळी रूग्णांना औषधांचे मोफत वाटपही करण्यात आले. शिबीरासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय खजिनदार डॉ.श्रीकांत येळेगावकर, शाखाध्यक्षा डॉ. नभा काकडे, उपाध्यक्ष रमणलाल सोनीमिंडे, सचिव डॉ. एन. बी. तेली यांचे विशेष सहकार्य मिळाले.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com