आरोग्य विभागाची पुन्हा चूक ! वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढले शुध्दीपत्रक

तात्या लांडगे
Friday, 25 September 2020

आरोग्य विभागाकडून झालेली ही दुसरी चूक

शुक्रवारी (ता. 25) शहरातील 612 संशयितांची कोरोना टेस्ट झाली. मात्र, महापालिकेच्या कोरोना रिपोर्टमध्ये 614 व्यक्‍तींचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या अहवालाचे शुध्दीपत्रक काढण्यात आले. 614 नव्हे तर 612 संशयितांची टेस्ट झाली होती, अशी दुरुस्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. एक महिन्यानंतर 30 मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाकडून झालेली ही दुसरी चूक आहे.

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी संशयितांचे टेस्टिंग वाढवा, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाला दिल्या. मात्र, अद्याप टेस्टिंगचे प्रमाण कमीच असल्याचे दिसून येते. दरम्यान, शुक्रवारी (ता. 25) शहरातील 612 संशयितांची कोरोना टेस्ट झाली. मात्र, महापालिकेच्या कोरोना रिपोर्टमध्ये 614 व्यक्‍तींचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या अहवालाचे शुध्दीपत्रक काढण्यात आले. 614 नव्हे तर 612 संशयितांची टेस्ट झाली होती, अशी दुरुस्ती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. एक महिन्यानंतर 30 मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाकडून झालेली ही दुसरी चूक आहे.

शहरातील आजचा कोरोना रिपोर्ट
शहरातील आठ हजार 185 व्यक्‍तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात चार हजार 805 पुरुष आणि तीन हजार 380 महिलांचा समावेश आहे. दुसरीकडे मृतांमध्ये 314 पुरुष आणि 152 महिला आहेत. रुग्ण आणि मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषच सर्वाधिक आहेत. आज शहरात 68 जण पॉझिटिव्ह सापडले असून त्यात 52 पुरुष तर 16 महिला आहेत. शारदा नगरातील 66 वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला आहे. मुकूंद नगर (न्यू बुधवार पेठ), होटगी नाका, दक्षिण कसबा, रोहिणी नगर, आनंद नगर, विजयालक्ष्मी नगर, जयकुमार नगर (विजयपूर रोड), लोकमान्य हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), बुधवार पेठ, भवानी पेठ, सहारा नगर, अंत्रोळीकर नगर, अशोक नगर (होटगी रोड), रेल्वे लाईन, थोबडे वस्ती (देगाव), जयलक्ष्मी नगर, विद्या नगर (शेळगी), इंडियन मॉडेल स्कूलजवळ, सुशिल नगर, दत्त नगर, श्रीकांत नगर, दोंडे नगर, भिमा नगर (जुळे सोलापूर), भिम नगर (मजरेवाडी), सनसिटी, गवळी वस्ती (दमाणी नगर), कमला नगर, भारत्न इंदिरा नगर, गुरुवार पेठ, सिध्देश्‍वर पेठ, जम्मा वस्ती (संतोष नगर), हिरेहब्बू कॉम्प्लेक्‍स (उत्तर कसबा), ब्रह्मदेव नगर (होटगी रोड), गणेश नगर, अंबिका नगर (बाळे), राघवेंद्र नगर, न्यू पाच्छा पेठ, सवेरा नगर (सैफूल), बंजारा सोसायटी, विजापूर नाका, पी.डब्ल्यूडी क्‍वॉर्टर, मुरारजी पेठ, मंगल रेसिडेन्सी (आसरा चौक), लिमयेवाडी, गायत्री नगर (वसंत विहार), भारत नगर (विडी घरकूल), भाग्योदय हौसिंग सोसायटी, नम्रता हौसिंग सोसायटी या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली.

ठळक बाबी...

  • आज शहरातील 612 संशयितांमध्ये 68 जण पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
  • शहरातील 77 हजार 899 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत 69 हजार 714 संशयितांची टेस्ट निगेटिव्ह
  • सहा हजार 743 रुग्णांनी यशस्वीपणे केली कोरोनावर मात
  • सद्यस्थितीत शहरातील 976 रुग्णांवर सुरु आहेत रुग्णालयांमध्ये उपचार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health department's mistake again ; Corrigendum issued by medical authorities