गरजूंना मदत व बंदोबस्तावरील पोलिसांना शिरखुर्मा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

शहरात रमजान ईदनिमित्त घरोघरी प्रार्थना व शिरखुर्म्याचा आस्वाद घेत ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. 
मागील महिन्यापासून रमजान महिन्याचे उपवास सुरू होते. त्यानंतर चंद्रदर्शनाच्या सूचनेनुसार सोमवारी (ता. 25) ईद करण्यात आली. कोरोना संकटामूळे सकाळी साडेसात ते अकरापर्यंत घरीच प्रार्थना झाल्या. कोरोना लॉकडाउनमुळे या वर्षी ईदचा सण घरीच साजरा झाला. 

सोलापूरः रमजान ईद निमीत्त प्रार्थनेसोबत कोरोना मुक्तीची दुआ मागण्यात आली. शहरातील अडचणीत असलेल्या गरजूंना फुडपॅकेट, मिठाईचे वाटप करण्यात आले. या सोबत अनेक भागात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना शिरखुर्मा वाटप करण्यात आला. 

हेही वाचाः सोलापुरात नगरसेविकेच्या पतीला कोरोना 

शहरात रमजान ईदनिमित्त घरोघरी प्रार्थना व शिरखुर्म्याचा आस्वाद घेत ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. 
मागील महिन्यापासून रमजान महिन्याचे उपवास सुरू होते. त्यानंतर चंद्रदर्शनाच्या सूचनेनुसार सोमवारी (ता. 25) ईद करण्यात आली. कोरोना संकटामूळे सकाळी साडेसात ते अकरापर्यंत घरीच प्रार्थना झाल्या. कोरोना लॉकडाउनमुळे या वर्षी ईदचा सण घरीच साजरा झाला. 

हेही वाचाः ऑनलाइन लिंक तयार करून त्यांना आणले स्वगृही 

दोन दिवसांपासून नागरिकांनी ईदच्या सणासाठी गरजेच्या साहित्याची खरेदी केली होती. त्यानंतर शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी निझामी यांनी कोरोनामुळे सर्वांना घरीच नमाजपठणाचे आवाहन केले होते. देश कोरोना संकटामध्ये असल्याने या आजारातून देश मुक्त व्हावा, यासाठी दुआ मागावी. लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर व गरीब माणसे संकटात सापडली आहेत. त्यांना या सणाच्या निमित्त अन्नधान्य देण्याचे सत्कार्य सर्वांनी करावे, असेही आवाहन त्यांनी केले होते. यानिमित्ताने समाज व देशाच्या कल्याणासाठी दुआ मागण्यात आली. हा सण साजरा करत असताना सोशल डिस्टन्सचा नियम पाळून परस्परांना शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक प्रकारच्या संस्था व संघटनांकडून गरजूंना मोठी मदत केली आहे. त्यांचे कार्य मोलाचे आहे, असे शहर काझी यांनी म्हटले आहे. पुढील काळातही गरजूंना आवश्‍यक मदत करण्याचे कार्य सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 
घरांमध्ये प्रार्थनेनंतर शिरखुर्म्याचे वाटप करण्यात येत होते. यानिमित्ताने घरांमध्ये अनेक प्रकारची मिठाई व विशेष पदार्थ तयार करण्यात आले. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना शाब्दी सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी शिऱखुर्म्याचे वाटप केले. या शिवाय 2 हजार 500 गरजू लोकांना सणाच्या निमीत्ताने फळे व मिठाईची पाकिटे देण्यात आली. 
ईदचा सण साजरा करत असताना यावेळी लॉकडाउनमुळे नातेवाईक व इष्टमित्रांना घरी बोलावता आले नाही म्हणून त्यांना फोनवर शुभेच्छा देण्यात आल्या. फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचे संदेश दिले जात होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help to needy people and shirkhurma to police on duty