मोठी ब्रेकिंग! राज्यातील 11 महापालिका 'कोरोना'च्या हिटलिस्टवर; उद्योग नगरीतील लॉकडाउन उठविण्याचा पेच

On the hit list of 11 municipal corona in the state
On the hit list of 11 municipal corona in the state

सोलापूर : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून हे जैविक संकट दूर करण्याच्या हेतूने मोदी सरकारने 22 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत पहिला लॉकडाउन जाहीर केला. तर दुसऱ्या लॉकडाउनची मुदत आता (3  मे) चार दिवस शिल्लक असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरार, मालेगाव, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर या महापालिका क्षेत्रात सर्वाधिक नऊ हजार 137 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 390 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता लॉकडाउन उठवायचा की नाही, असा पेच सरकारपुढे उभा राहिला आहे.
राज्यातील दोन हजार 673 जणांना 14 एप्रिलपर्यंत कोरोना झाला होता. त्यानंतर जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या 16 दिवसांत (ता. 29 एप्रिलपर्यंत) तब्बल सात हजार 217 जणांना कोरोना झाला. आतापर्यंतच्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील अवघे 491 तर शहरातील तब्बल नऊ हजार 399 जणांचा समावेश आहे. शहरांमधील झोपडपट्टीची समस्या अन सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर, दाटीवाटीने राहणारे लोक, भाजी अथवा जीवनाश्यक वस्तू खरेदी करताना नागरिकांनी सुरक्षिततेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे शहरांमध्ये कोरोना वाढल्याचे चित्र आहे. त्यामध्ये सोलापूरसह, पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबवली, मीरा भाईंदर, वसई विरार, मालेगाव, औरंगाबाद, नागपूर, नाशिक या शहरांचा समावेश आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य पथकानेही नेमके याच मुद्द्यांवर बोट ठेवत स्वच्छतेच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा : पुस्तक विकत घेण्याची गरज नाही; अशी करा पहिली ते १२ वीपर्यंतची पुस्तके डाऊनलोड (व्हिडीओ)
राज्यातील 11 महापालिका कोरोनाच्या हिटलिस्टवर

सद्यस्थितीत 29 एप्रिलपर्यंत मुंबई महापालिका परिसरात सर्वाधिक सहा हजार 644 जणांना कोरोना झाला, तर 14 एप्रिलनंतर चार हजार 748 रुग्ण वाढले आहेत. तर ठाणे महापालिका क्षेत्रात 373, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 162, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 158, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात 125, वसई विरार महापालिका क्षेत्रात 128, मालेगाव महापालिका क्षेत्रात 171, पुणे महापालिका क्षेत्रात एक हजार 62 जणांना कोरोना झाला आहे. विशेषतः पुणे महापालिका क्षेत्रात मागील 16 दिवसांत 752 रूग्णांची भर पडली आहे. 14 एप्रिलला सोलापूर महापालिका क्षेत्रात एक रुग्ण होता. त्यामध्ये मागील 16 दिवसांत 78 रुग्ण वाढून आता रूग्णांची संख्या शहरात 79 झाली असून ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद महापालिका क्षेत्रात 14 एप्रिलपर्यंत 23 रुग्ण होते, तर आता रुग्णांची संख्या 103 वर पोहोचली आहे. नागपूर महापालिका क्षेत्रात 14 एप्रिलपर्यंत 39 रुग्ण होते. आता रुग्णांची संख्या 132 झाली आहे. दरम्यान, राज्यातील एकूण एक हजार 593 रुग्ण बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा : ॲम्बुलन्स मधून तो उतरला, घरी जायच्या आत त्याला फोन आला अन तो कोरोना पॉझिटिव्ह झाला
औद्योगिक क्षेत्रातील लॉकडाउन उठविण्याचा पेच

लॉकडाउनच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाईल, परिस्थिती आटोक्यात येईल आणि 3 मेपासून टप्प्याटप्याने उद्योग, व्यवसाय, वाहतूक सुरू करण्याचे नियोजन केंद्र व राज्य सरकारने केले होते. मात्र, आतापर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण नऊ हजार 890 कोरोनाग्रस्तांपैकी तब्बल नऊ हजार 137 रुग्ण या 11 महापालिका क्षेत्रातील असल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये मुंबई महापालिका सहा हजार 644, ठाणे महापालिका 373, नवी मुंबई महापालिका 162, कल्याण डोंबिवली महापालिका 158, मीरा भाईंदर महापालिका 125, वसई विरार महापालिका 128, मालेगाव महापालिका 171, पुणे महापालिका एक हजार 62, सोलापूर महापालिका 79, औरंगाबाद महापालिका 103, नागपूर महापालिका 132 रुग्णांचा समावेश आहे. लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल करून राज्याची विस्कळीत झालेली आर्थिक घडी बसविण्याचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र, 'उद्योगनगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण शहरात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळू लागल्याने आता लॉकडाउन शिथिल होणार का, याची उत्सुकता लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com