कोरोनाच्या स्थितीनुसार प्रत्येकासाठी संशोधन समितीने तयार केलेला डायट प्लॅन आहे कसा? जाणुन घ्या 

DIET.jpg
DIET.jpg
Updated on

सोलापूरः कोरोना आजारामध्ये प्रत्येक जणाच्या  स्थितीनुसार नेमका आहार कसा असावा या बाबत देशपातळीवरील एकूण 30 आयुर्वेद तज्ञांच्या समितीने निरोगी, कोरोना बाधित व क्वारंटाईन व्यक्तींनी नेमका कोणता आहार घ्यावा ते सुचवले आहे. 

सात राज्यातील निमा या राष्ट्रीय वैद्यकीय संघटनेच्या एकूण 30 आयुर्वेद तज्ञांच्या समितीने केंद्र सरकारला संशोधन सादर केले. कोरोना आजाराच्या विविध स्थितीत भारतीय पध्दतीचा आहार कशा पध्दतीने आजारास प्रतिकारक ठरू शकतो.हे निश्चित केले गेले. कोरोना संसर्गात स्वतःची कोणती स्थिती आहे यावरून प्रत्येकासाठी डायट प्लॅन सुचवला आहे. या तज्ञांनी रोजच्या आहारातील अँटीव्हायरल घटकयुक्त व पचनास सोपा पण पौष्टीक आहार सुचवला आहे. 

निरोगी व्यक्ती, होम क्वारंटाईन, इन्स्टिट्युशन क्वारंटाईन व कोरोना योध्दा ः दररोजच्या आहारात गव्हाचे पीठ, सातु व साळीचे तांदुळ वापरावेत. गव्हाची चपाती किंवा ज्वारीची भाकरी तसेच मुग दाळ किंवा मसुर दाळीचा वापर असावा. धान्य शिजवण्यापुर्वी ते भाजुन घेतलेले असावे. आंबा पन्हे, कोकम, वाळ्याचे शरबत आदींचा वापर करावा. लोणी काढलेल्या ताज्या ताकाचा वापर करता येईल. ऋतुनुसार मिळणारी फळे आहारात असावीत. तुळसी पाने, धने, दालचिनी पाण्यात उकळून हे पाणी पिण्यासाठी वापर करावा. दिवसातून दोन वेळचे जेवण उपयुक्त आहे. तसेच मन व शरिर योग्य संतुलीत ठेवण्यासाठी व्यायाम व योगासने करावीत. थंड पाणी, बर्फ, आंबवलेले पदार्थ, पावसाळ्यातील पालेभाज्या हे टाळले पाहिजे. 

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीः या व्यक्तीसाठी मुग, कुळीथ, यव (जव) यांचा वापर आहारात असावा. तसेच शेवगा सुप जेवणात असावे. वांग्याचे भरित देखील खाता येईल. कारले, पडवळ या भाज्या खाव्यात. सुंठीचा उपयोग नियमित करावा. त्यासाठी गरजेपुरते तुप वापरावे. या व्यक्तींनी दहा मिनिटे ध्यान व केवळ अश्‍वासनाचा सराव करावा. उबदार वातावरणात व गरम कपडे वापरावेत. थंड पदार्थ टाळावेत. लिंबु शरबत देखील प्रकृतीनुसार घ्यावे. 

को- मॉर्बिड (इतर आजार असलेले कोविड रुग्ण)ः इतर आजारामध्ये रक्तदाब, मधुमेह अशा आजार असलेल्या रुग्णांना कोविडची लागण झाली असेल तर त्यांच्यासाठी देखील आहाराचे नियोजन उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या सल्ल्याने करावे लागेल. त्यांच्यासाठी मुग, कुळीथ, यव(बार्ली) याचे अद्रक टाकलेले सुप आहारात असावेत. भाज्यासोबत हळद, गाजर, कोथिंबिर आदींचा उपयोग आहारात असावा. या व्यक्तींना शेवगा सुप देखील द्यावे. पडवळ व कारल्याचा उपयोग भाजीत करावा. आहारात अद्रकाचा वापर अत्यावश्‍यक आहे. 

कोरोना आजार होऊन गेलेल्या व्यक्तीः कोरोना आजार पुन्हा होऊ नये म्हणून आर्युवेदामध्ये त्यास अपुर्नभव चिकित्सा म्हणतात. या व्यक्तींनी त्यांच्या आहारात काळ्या उडदाची दाळ, हुलगा, कुळीथ आदींचा वापर करावा. लोणी काढलेले  ताजे ताक मीठ व अद्रक टाकून प्यावे. या व्यक्तीला केवळ बैठी योगासने जसे की पद्मासन, सुखासन या सह काही शरीर शिथील करणारे शवासन करावे. उबदार वातावरण व रोज आठ तास झोप असावी. 

गोल्डन मिल्क सर्वासाठी 
गोल्डन मिल्क म्हणजे हळद घातलेले दूध रोज प्यावे. पावसाळ्यात त्यामध्ये जिरा, धने, काळे मिरे, अद्रक, लसण, हिंग व पिपंळीचा वापर उपयुक्त ठरतो. मात्र रोज हे दूध सर्वच कोरोना व नॉन कोरोना व्यक्तींना उपयुक्त ठरणार आहे. प्रकृतीमानानुसार गोल्डन मिल्कचे प्रमाण कमी जास्त करता येते. 

संतुलीत आहारातून प्रतिकारक्षमता 
 केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाला हा अहवाल सादर करण्यात आला आहे. या आजारात प्रतिकारक्षमता हा घटक महत्वाचा असेल तर शरिरातील नैसर्गिक प्रतिकारक्षमता संतुलीत जीवन पध्दतीतून साधता येते हा निष्कर्ष काढला आहे. . 
- डॉ.विनायक टेंभुर्णीकर, केंद्रीय अध्यक्ष निमा संघटना तथा सदस्य निमा कोविड19 प्रोटोकॉल समिती, सोलापूर. 

जठराग्नी हा आहारासाठी महत्वाचा 
प्रत्येक व्यक्तीचा जठराग्नी हे केंद्र मानून त्यानुसार आहार योजना सुचवण्याचे तत्व पाळते. ही बाब समजून घेत अत्यंत सामान्य स्थितीतील व्यक्तीचे आरोग्य संतुलीत करणारा आहार सुचवला आहे. . 
- डॉ. साधना कुलकर्णी, सदस्य, निमा कोविड19 प्रोटोकॉल समिती 

आहाराच्या बाबतीत रुग्णांकडून प्रतिसाद 
प्रतिबंधात्मक उपाय व प्रतिकारक्षमता या दोन गोष्टीसाठी आहार व काढा सुचवण्यात आला. त्याचा उपयोग आता सर्वच ठिकाणी केला जात आहे. वातावरण व व्यक्तीची प्रकृती या दोन आधाऱावर स्थानिक भागात पिकणारे धान्य व फळांचा वापर करून चांगल्या प्रतिकारक्षमतेसाठी लागणारे आरोग्य मिळवता येते. . 
- डॉ. मोहन येंडे, सदस्य निमा कोविड 19 प्रोटोकॉल समिती  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com