अबब... सल्ल्याला मिळाली 500 रुपयांची नोट 

How did Arbaaz Shaikh April Fool
How did Arbaaz Shaikh April Fool

सोलापूर : सैराट चित्रपटाने सर्वांना वेड लावले होते. सैराट म्हटले की...आर्ची, परश्‍या, लंगड्या आणि सल्ल्या ही पात्रे आपल्या डोळ्यांसमोर लगेच येतात. चित्रपटात या सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली. "सैराट'मधील एक पात्र म्हणजे परश्‍याचा मित्र सल्ल्या. सल्ल्याची भूमिका साकारणारा अरबाज शेख यानेदेखील चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे. प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात स्थान निर्माण केलेल्या सल्ल्याच्या आयुष्यातील एप्रिल फूलचे घडलेले किस्से जाणून घेऊयात. 
सल्ल्या हा जेऊर येथे राहतो. तो कला शाखेतील पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. सल्ल्या आठवीत असताना त्याचे मित्र संकेत आणि महेश यांनी सल्ल्याला एप्रिल फूल करायचे ठरवले. एक एप्रिलला नेहमीप्रमाणे शाळेत गेल्यावर सल्ल्याच्या मित्रांनी तो वर्गात येण्यापूर्वी त्याच्या बेंचच्या खाली 500 रुपयांची नकली नोट ठेवली. थोड्यावेळानंतर सल्ल्या त्याच्या जागेवर येऊन बसला. बेंचजवळ येताचक्षणी त्याची नजर 500 रुपयांच्या नोटेवर पडली. सल्ल्याने ताबडतोब आपल्या आजूबाजूला पाहिले. आपल्याला कोणी पैसे उचलताना पाहणार तरी नाही ना, याचा अंदाज घेऊन मित्रांना नजरअंदाज करत सल्ल्याने बेंचखालील 500 रुपयांची नोट नकळत हळूच पायाने उचलून घेतली. त्यानंतर आपल्या खिशात ठेवली. आपल्याला मिळालेल्या पैशाचा कसा वापर करायचा. त्या पैशातून काय खरेदी करायचे. अशा एक ना अनेक कल्पना सल्ल्याने योजल्या. तसेच सल्ल्याकडे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक साहित्य नव्हते. त्यामुळे मिळालेल्या पैशातून खडू, कंपासपेटी आणि वह्या-पुस्तके आदी साहित्यांची खरेदी करण्याचे ठरवले. थोड्यावेळाने सल्ल्याचा मित्र संकेतने माझे 500 रुपये हरवले असून कोणी घेतले आहेत का. मला ते 500 रुपये शाळेत भरायचे असल्याची विचारणा केली. तसेच आता कसे करायचे, असे ठरलेल्या नियोजनानुसार बोलण्यास सुरवात केली. वर्गातील मुलांनी मी नाही घेतले असे सांगण्यास सुरवात केली. त्यानंतर सल्ल्याच्या मित्रांनी सल्ल्याला विचारले असता, सल्ल्याने पैसे असूनही मी पैसे घेतलेच नाही, असे सांगितले. हे सर्व नाटक सुरू असताना संकेत आणि महेश हे सल्ल्याला म्हणाले की, तुझ्या खिशात ठेवलेली ती नोट नकली आहे. यावरून सल्ल्याची खिल्ली उडवण्यात आली. अशा पद्धतीने त्याच्या आयुष्यात मित्रांनी त्याला एप्रिल फूल बनवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com