अन्यायाच्या विरोधात व जगण्याच्या अधिकारासाठी मानवी हक्क संस्थांचा लढा 

human rights.jpg
human rights.jpg

सोलापूरः मानवाधिकार समस्यांच्या सोडवणूक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. निस्वार्थपणा व कायदेशीर चौकटीची जाण या आधारे दैनंदिन जीवनातील प्रश्‍न सोडवण्याचे काम केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकाराचे मुल्य जपण्यासाठी काम केले जाते. त्या अंतर्गत दिल्ली येथे देखील मानवाधिकार आयोगासारख्या यंत्रणा काम करतात. लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी व फसवणूक टाळली जावी, म्हणून विशेष प्रयत्न स्वयंसेवी संस्था मानवाधिकाराबद्दल जनजागृती व मदत करण्याचे अनुषंगाने करत असतात. अन्याय, फसवणूक व जगण्याचा अधिकार या मुद्दयावर मानवी हक्क संघटना काम करतात. 

शहरात कॉल करून नविन मोबाईल पाठवतो असे म्हणून पैसे भरुन घेतले जात असत. तसेच पैसे भरल्यानंतर प्रत्यक्षात पार्सलमध्ये मोबाईलच्या एैवजी दगड किंवा साबण पाठवण्याचे प्रकार सुरू होते. तेव्हा ऑल इंडिया ह्युमन राईटस संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पार्सल पाठवणारी यंत्रणा व पोलिसांची मदत घेतल्यानंतर ही फसवणूक थांबली. अनेक वेळा कौटुंबिक वादासारख्या अनेक घटना घडतात. तसेच पती व पत्नीमधील वादाचे प्रकार देखील होतात. प्रत्यक्षात हे वाद किरकोळ स्वरुपाचे असले तरी सामंजस्याचा तोडगा काढून देण्याचे काम स्वयंसेवी संस्था पदाधिकारी करतात. अनेक कुटुंबे उघड्यावर पडण्यापासून वाचवण्याचे काम केले जाते. सेवाभावी पध्दतीने मदत करणारे वकील, पोलिस अधिकारी यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी यंत्रणेद्वारे न्याय मिळवून देण्यासाठी या कामाला मदत करतात. 

मानवता व न्यायबुध्दीने प्रश्‍न सोडवावेत 
मानवाधिकाराची माहिती लोकापर्यंत पोहोचवत असताना त्यासोबत त्यांचे प्रश्‍न देखील न्यायबुध्दीने सोडवण्याचे काम केले जाते. प्रत्येक व्यक्ती कुठेतरी समस्येस सापडतो तेव्हा मदत केली जाते 
- हेमंत ढवळशंख, जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया ह्युमन राईटस 


अचुक मार्गदर्शन व तज्ञांची मदत 
नागरिकांच्या अनेक समस्या त्यांना नेमक्‍या कशा सोडवता येतील याची माहिती नसते. तसेच त्यांची फसवणूक देखील होते. तसेच प्रत्येकाला न्याय मिळवण्याचा हक्क आहे. तेव्हा त्यांना अचुक मार्गदर्शन व तज्ञांची मदत पोहोचवण्याचे काम केले जाते. 
- प्रकाश अवस्थी, जिल्हा संघटन सचिव, ऑल इंडिया ह्युमन राईटस 

मानवाधिकार ही जागतिक संकल्पना 
मानवाधिकार ही आता जागतिक संकल्पना आहे. देशपातळीवर मानवाधिकार आयोग काम करतो. मानवी अधिकाराचे नियम व लाभ काय आहेत याची जनजागृती स्वयंसेवी संस्था करत असतात. एखादा व्यक्ती न्यायापासून वंचित राहत असेल तर त्याला संस्था मदत करत असतात. स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या संवेदनशीलतेवर हे कार्य आधारित आहे. 
ऍड. नितीन हबीब, विधीज्ञ सोलापूर  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com