Agitation
Agitation

आमच्या सात मागण्या मान्य करा, अन्यथा स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना फोन आंदोलन ! कोणी दिला इशारा? वाचा 

सांगोला (सोलापूर) : किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे सात मागण्या सादर केल्या आहेत. त्या मागण्या मान्य नाही केल्या, तर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 10 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरातून लाखो नागरिक पंतप्रधानांच्या दिल्ली कार्यालयात फोन करणार असल्याचा इशारा श्री. कदम यांनी दिला आहे. 

शेतकरी, कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्या जनतेच्या खात्यावर थेट एक हजार 500 रुपये कोरोना मदत निधी म्हणून जमा करावेत, पंतप्रधान यांनी औषध आणि लस याबाबतचे राष्ट्रीय नियोजन व कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करावा, भारतीय सैन्याला सर्व धर्मांच्या व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मानवंदना द्यावी, कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांना नेमकी कोणती औषधे व कोणते उपचार दिले जातात, हे जनतेसाठी अधिकृतपणे जाहीर करावे, कोरोना नियंत्रण कार्यक्रम अधिक गतिमान व व्यापक करण्यासाठी केंद्रात व प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे "विरोधी पक्ष मदत व सल्लागार समिती' तत्काळ स्थापन करण्यात यावी, देशातील कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक राज्यातील राज्यपालांनी जनतेसाठी नेमकी काय मदत केली याचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध करावा आणि स्वतःच्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य, मेडिकल, पोलिस व इतर क्षेत्रातील नेमक्‍या व्यक्तींना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा व विशेष सहाय्य बहाल करण्याबाबतची राष्ट्रीय घोषणा करावी अशा सात मागण्या प्रफुल्ल कदम यांनी पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहे. 

याबाबत श्री. कदम म्हणाले, यापूर्वी किसान आर्मी व वॉटर आर्मीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या कार्यालयात हजारो फोन करून आंदोलन करण्यात आले होते. तथापि, जनतेच्या प्रश्नांना राज्यपालांना कोणतेच उत्तर देता आले नाही. त्यामुळे आता पंतप्रधान कार्यालयावर फोन आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सध्याची देशाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही या मागण्या सादर केल्या असून शासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन खूप महत्त्वाचे आहे. हे आंदोलन घरातच बसून करायचे असल्याने देशभरातील लाखो लोक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com