भाजीपाल्याच्या वाहनातून अवैध दारू वाहतूक 

शशीकांत कडबाने
Monday, 13 April 2020

अवैध दारू हस्तगत
भाजीपाल्याच्या गाडीमध्ये कॅरेट टाकून वाहतूक केली जात असलेली सुमारे चार लाख 20 हजार रूपये किमतीची अवैध दारू हस्तगत करीत वाहतुक करणाऱ्यांवर अकलूज पोलिसांनी अटक करून कारवाई केली आहे. 

अकलूज (जि. सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व संचारबंदीची काठेकोर अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, असे असले तरी भाजीपाल्याच्या गाडीमध्ये अवैध दारू वाहतूक केली जात असल्याच्या प्रकार अकलूज पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघड झाला आहे. 
भाजीपाल्याच्या गाडीमध्ये कॅरेट टाकून वाहतूक केली जात असलेली सुमारे चार लाख 20 हजार रूपये किमतीची अवैध दारू हस्तगत करीत वाहतुक करणाऱ्यांवर अकलूज पोलिसांनी अटक करून कारवाई केली आहे. 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलूज पोलिस स्टेशनअंतर्गत माळीनगर बीटचे पोलिस पेट्रोलींग करीत असताना महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच 11/बीएल 4966) या वाहनामधून जावरवाडी (ता. इंदापूर) येथील असिफ रमजान तांबोळी आणि माळीनगर (ता. माळशिरस) येथील सलिम महिबुब तांबोळी हे भाजीपाल्याचे गाडीमध्ये कॅरेट टाकून ती गाडी भाजीपाल्याची आहे, असे सांगुन घेवून जात होते. मात्र पोलीसांनी गाडीची कसून तपासणी केली असता त्यामध्ये अवैध दारुची वाहतुक होत असल्याचे दिसून आले. पोलिसांना 4 लाख तीस हजार 436 मुद्देमाल जप्त केला असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal alcohol trafficking in vegetable vehicles