
कोरोना लसीकरणासाठीच्या रंगीत तालीम अंतर्गत २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्यांना सामाजिक अंतर पाळता यावे, यासाठी व्यवस्थित गोल आखले होते. त्यानंतर लसीकरणाच्या पहिल्या पायरीत लाभार्थ्यांची ओळख व नावनोंदणीबाबत संगणकीकृत सोय केलेली असून त्यानंतर प्रत्यक्ष लस दिली जाणार आहे.
अकलूज (सोलापूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडली. कोरोनाचे लसीकरण करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात घेण्यात आलेल्या (ड्राय रन) रंगीत तालीमच्या उपक्रमाचा शुभारंभ प्रांताधिकारी शमा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुप्रिया खडतरे, पुणे उपसंचलकांकडून आलेले निरीक्षक डॉ. संजय जठार, डॉ. गणेश जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते, डॉ. श्रेणीक शहा, डॉ. संतोष खडतरे, डॉ. संकल्प जाधव, डॉ. समीर शेख, डॉ. वसंत भोसले, डॉ. प्रविण शिंदे, डॉ. मनीषा शिंदे आदी उपस्थित होते. या रंगीत तालीमदरम्यान पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरु, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी भेटी दिल्या.
सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना लसीकरणासाठीच्या रंगीत तालीम अंतर्गत २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्यांना सामाजिक अंतर पाळता यावे, यासाठी व्यवस्थित गोल आखले होते. त्यानंतर लसीकरणाच्या पहिल्या पायरीत लाभार्थ्यांची ओळख व नावनोंदणीबाबत संगणकीकृत सोय केलेली असून त्यानंतर प्रत्यक्ष लस दिली जाणार आहे.
त्यांनतर अर्धातास प्रतिक्षा खोलीत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून तेथे अत्यावश्यक सर्व सेवा उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये अत्यावश्यक औषधे अॉक्सिजनसह गरज भासल्यास पुढील उपचारासाठी रूग्णवाहीका तयार ठेवली होती. सोलापूर येथील शल्य चिकिस्तक कार्यालयाकडून आलेल्या चमूनेही या मोहिमेस मदत केली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रंगीत तालीमदरम्यान उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध असून त्यांनी लसीकरणादरम्यान येणाऱ्या समस्या निवारणासाठीच्या अॉक्सिजन रूग्णवाहिका यासह सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या असून लसीकरण मोहिम यशस्वी होईल.
- डॉ. संजय जठार व डॉ. गणेश जगताप- निरीक्षकमाळशिरस तालुक्यातील सर्व विभागांनी एकत्र येऊन कोरोनाकाळात यशस्वीपणे लढा दिला. त्याच प्रकारे लसीकरणासाठीही सर्व विभाग एकत्र काम करतील व लसीकरण यशस्वीपणे पार पडतील, असा मला विश्वास आहे.
- शमा पवार, प्रांताधिकारी, अकलूजशासनाने दिलेल्या सूचनेनुसार लसीकरणासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध केल्या आहेत. आमचा सर्व कर्मचारी वर्ग पूर्णपणे प्रशिक्षित असून आम्ही लसीकरण मोहीम यशस्वी करून दाखवू.
- सुप्रिया खडतरे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अकलूजकोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करावयाचे असून त्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे. लसीकरणासाठी ३४६७ आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार असून पहिल्या टप्प्यात 14 लसीकरण सेंटरवर प्रशिक्षित ३७ सेवक व व्हक्सिनेटर तसेच ४६ डॉक्टर आदींची नेमणूक केली असून पूर्ण तयारी केलेली आहे.
- डॉ. रामचंद्र मोहिते, तालुका वैद्यकीय अधिकारी, माळशिरस