
आपलेच इयत्ता दुसरीचे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तिसरीत आल्याने लॉकडाऊन काळापासून आतापर्यंत पालकांचा खूप छान सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गुरूमंत्र उपक्रमांतूनही मुलांशी बोलणे, कोरोनाविषयक जनजागृती करत मुलांनी मास्क तयार करणे, घोषवाक्य तयार करून लिहिणे या विविध इतर उपक्रमांसह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वर्गातील 52 मुलांना दररोज एका विषयाचे अध्यापन, लेखन दिले जाते.
सोलापूर: कोरोनाच्या आपत्तीमुळे शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले असून, सर्व पालकांना, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चिंता सतावत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनमध्येच सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन वेळ वाया न घालविता वर्क फ्रॉम होम करण्यास सुरुवात झाली. आपली शाळा, आपला वर्ग या व्हॉटस ऍप ग्रुपच्या सहाय्याने शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित सोलापूरच्या नूतन मराठी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती नर्मदा मिठ्ठा-कनकी या तिसरीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करीत सूचना देत आहेत.
हेही वाचा ः महेश कोठेच्या प्रवेशापूर्वी शरद पवार आज दुपारी दोन वाजता घेणार बैठक !
आपलेच इयत्ता दुसरीचे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तिसरीत आल्याने लॉकडाऊन काळापासून आतापर्यंत पालकांचा खूप छान सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गुरूमंत्र उपक्रमांतूनही मुलांशी बोलणे, कोरोनाविषयक जनजागृती करत मुलांनी मास्क तयार करणे, घोषवाक्य तयार करून लिहिणे या विविध इतर उपक्रमांसह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वर्गातील 52 मुलांना दररोज एका विषयाचे अध्यापन, लेखन दिले जाते. त्यासाठी टेलिग्राम, स्वाध्यायमाला, युट्युब, शिक्षक मित्र, पिंटरेस्ट, पिक्सआर्ट असे विविध ऍप वापरण्यात येतात. मनपा शिक्षण मंडळ, सोलापूर आयोजित ज्ञान की बात या यूट्यूब चैनल वर स्वतः मिठ्ठा यांनी तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे व्हिडिओ तयार करून शेअर केले. फक्त ऐका व लिहा ही जुन्या परंपरेची माळ बदलत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन दिनविशेष उपक्रम म्हणून महिन्यातील प्रत्येक सण, विशेष दिन याची सूचना गुगल पेवर दिली जाते. आतापर्यंत कोरोना जनजागृती, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नागपंचमी, रक्षाबंधन, थॅंक्स टीचर या प्रत्येक उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक उपक्रमाचा विशेष व्हिडिओ तयार करून पालकांच्या ग्रुप वर पाठविले जाते. एनएमव्ही सोलापूर या नावाने
युट्यूबवर हे व्हिडिओ शेअर करण्यात येतात. विद्यार्थी अध्ययन करीत अभ्यासाचे फोटो दररोज शिक्षकांना पाठवितात. स्वतः शिक्षकांनी तयार
केलेली चाचणी सोडवतात. महिन्यातील अभ्यासावर चाचणी घेतली जाते. ऑनलाइन चाचणीही विद्यार्थी सोडवतात. थॅंक्स टीचर उपक्रमांतर्गत शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा व सुशोभन स्पर्धा घेऊन त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल्स बक्षीस म्हणून देण्यात आले.
हसत-खेळत शिक्षण
विद्यार्थी- शिक्षक यांच्यात मोबाईलच्या सहाय्याने तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्यात पालकांचे सहकार्य फार मोलाचे आहे, मॅडम आपल्यापासून लांब असल्या तरी त्यांचा आवाज व सूचना दररोज ऐकत विद्यार्थी अध्ययन करतात, असे पालकांचे म्हणणे आहे. वर्गातील सर्व पालक ग्रुपवर सक्रिय असून, ज्यांच्याकडे मोबाईल नाही. त्यांनी इतरांचे नंबर दिलेला आहे. या पद्धतीने शाळा सुरू होईपर्यंत हसत-खेळत ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण सुरू आहे.