ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची वाढली चिंता 

प्रमोद बोडके
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

घाटे अळीचा प्रादुर्भाव 
ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक फटका हरभऱ्याच्या पिकाला बसण्याची शक्‍यता आहे. या वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे. या कालावधीत पावसाने हजेरी लावल्यास द्राक्षाला भुरी आणि डावण्या या आजाराची लागण होण्याची शक्‍यता आहे. पावसाचा परिणाम ज्वारीवरही होण्याची शक्‍यता असल्याची माहिती सोलापूरचे कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी दिली. 

सोलापूर : ज्या वेळी शेतीत पिकते त्यावेळी शेतमालाला भाव नसतो. ज्या वेळी शेतमालाला भाव मिळतो त्यावेळी शेतात काही नसते अशा दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांवर आता अस्मानी संकट घोंगावत आहे. हिवाळ्यातून थंडी गायब झालेली असतानाच सोलापूर शहर व परिसरात सध्या विचित्र वातावरणाचा प्रत्यय येऊ लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. हवेतील गारवा वाढला असून ढगाळ वातावरण होऊ लागले आहे. या वातावरणाची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/ajit-dada-gave-fifty-crores-boramani-ten-minutes-260102">हेही वाचा - अजितदादांनी दहा मिनिटात "बोरामणी'ला दिले पन्नास कोटी 
या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर व शेतीवर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात सोलापूरच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. गेल्या दोन दिवसात शहरातील किमान तापमानातही घट झाल्याचे समोर आले आहे. हवेतील गारवा वाढल्याने किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरात ढगाळ वातावरण झाल्याने अवकाळी पाऊस हजेरी लावेल अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 
हेही वाचा - या महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मिळतील प्रत्येकी दहा लाख 
कधी वातावरणात अचानक उकाडा, उन्हाचा चटका तर कधी वातावरणात गारवा आणि ढगाळ वातावरण असे संमिश्र वातावरण सध्या सोलापूर शहर व परिसरात झाले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत सोलापूर शहर व परिसराच्या कमाल व किमान तापमानात वाढ होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased concern for farmers in cloudy weather