सोलापुरकरांची वाढली धाकधूक ! इंदिरानगरात किती रुग्ण...याची लागली चिंता 

5e6f13b6214ed825688f3203 - Copy.jpg
5e6f13b6214ed825688f3203 - Copy.jpg

सोलापूर : सोलापुरात शनिवारपर्यंत (ता. 18) 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आता जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी 70 फूट रोड, इंदिरानगर, गेंट्याल टॉकिजकडे जाणारा रस्ता सील केला आहे. हे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून पोलिसांनी जाहीर केले असून महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्या भागातील नागरिकांची घरोघरी जावून वैद्यकीय पडताळणी सुरु केली आहे. या भागात आता किती रुग्ण सापडतील, याची धाकधूक सोलापुकरांना लागली आहे. 


पाच्छा पेठ परिसरातील एक किलोमीटरचा परिसर सील केल्यानंतर पोलिसांनी आयेशा मस्जिद, जुना बोरामणी नाका, जोशी गल्ली, रविवार पेठ, भुलाभाई चौक, चिराग गल्ली, ताकीया कब्रस्तान, विठ्ठल पेठ, साळुंखे चौक हा परिसर सील केला आहे. त्यानंतर रविवारी (ता. 19) पोलिसांनी इंदिरा नगर, गेंट्याल टॉकीकडे जाणारा रस्ता आणि 70 फूट रोड सील केला आहे. या भागातील एक महिला मृत झाल्याने हा भाग प्रतिबंधित करण्यात यावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी हा भाग बॅरिकेड लावून सील केला आहे. या भागातील नागरिकांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन लावले आहेत. किमान पोलिस बंदोस्त लावण्यात आला असून सर्वत्र बॅरिकेड लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी दिली. दरम्यान, 11 एप्रिलपर्यंत निश्‍चिंत असलेले सोलापूर आठ दिवसांत रेड झोनकडे वाटचाल करु लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर लक्षणे असलेल्या नागरिकांनी स्वत:हून वैद्यकीय पडताळणीसाठी पुढे यावे, असे आवाहन सातत्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 
 


सर्व्हेक्षणासाठी महापालिकेचे 540 कर्मचारी 
सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शनिवारपर्यंत 14 वर पोहचली होती. शहरातील तीन परिसर सील केले असून या भागात पोलिसांनी ड्रोन लावले असून बॅरिकेड लावून रस्ते बंद केले आहेत. त्या परिसरातील नागरिकांची घरोघरी जावून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यासाठी महापालिकेचे डॉक्‍टर, नर्सेस, लिपीक, आशा वर्कर्स असे तब्बल 540 कर्मचारी नियुक्‍त करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com