कोरोनासह इतर विषाणूंचा थांबणार संसर्ग ! रसायनशास्त्राचे प्रा. डेलेकर व प्रा. देशमुखांनी बनविला सरफेस कोटिंग अँटीमाइक्रोबियल पेंट

3corona_20update_20india.jpg
3corona_20update_20india.jpg
Updated on

सोलापूर : साथ आजारांचा प्रसार हा पृष्ठभागाच्या संपर्कातून 80 टक्‍क्‍यांपर्यंत होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. दैनंदिन जीवनात बॅक्‍टेरिया आणि बुरशी सर्वत्र आढळतात. पोषक वातावरणात सूक्ष्मजंतू त्वरीत पुनरुत्पादित होतात. त्यामुळे वातावरणात दुर्गंध, अस्वच्छता पसरतो आणि संसर्गाचा प्रसार वाढतो. कोरोना काळातही त्याचा अनुभव आला आणि शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्रा. सागर डेलेकर व सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाचे प्रा. शामकुमार देशमुख यांनी सरफेस कोटिंग अँटीमाइक्रोबियल पेंटची निर्मीती केली आणि आता त्याच्या पेटंटसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या पेटंमुळे साथीचे आजार वाढणार नाहीत, असा दावा या संशोधकांनी केला आहे.

कोरोनाच्या साथीने मानवासमोर नवीन आव्हाने निर्माण केली आहेत. कोरोनाचा प्रसार पृष्ठभागाद्वारे अधिक होतो. या पार्श्‍वभूमीवर सरफेस कोटिंग अँटीमाइक्रोबियल पेंटची निर्मीती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. शामकुमार देशमुख (दयानंद महाविद्यालय, सोलापूर, रसायनशास्त्र विभाग) यांनी केली आहे. ट्यूबलाईट व सुर्यप्रकाशातही हा पेंट जिवाणू व विषाणू मारण्याचे काम करतो. या पेंटचा प्रस्ताव पेटंटसाठी मुंबई कार्यालयात दाखल करण्यात आला आहे. पेंट तयार करण्यासाठी साधारणपणे पाच ते आठ हजारांचा खर्च आला असून बाजारात त्याचा दर त्यापेक्षाही कमी राहील. हा पेंट तयार करण्यासाठी आठ- नऊ महिन्यांचा कालावधी लागला असून आता त्याला अंतिम स्वरुप प्राप्त झाले आहे.

अँटीमाइक्रोबियल पेंटची वैशिष्टे...

  • वाहनांच्या पत्र्यांना पावडर कोटिंग केल्यानंतर त्यावरील जिवाणू, विषाणू नष्ट होतात
  • कोटिंग कोणत्याही बाह्य उत्तेजनाशिवाय नियंत्रित पध्दतीने विविध आरओएस (Reactive oxygen species) सोडू शकते
  • अँटीमाइक्रोबियल पेंट मटेरियलमध्ये ड्रग रेझिस्टन्स निर्माण होत नाही. त्यातून पर्यावरणही दूषित होत नाही
  • विषाणूने स्वत:मध्ये बदल केल्यानंतरही या पेंटच्या माध्यमातून त्याचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो
  • ग्रॅम पॉझिटिव्ह, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्‍टेरिया, बुरशी आणि विषाणूंविरूद्ध अँटीमाइक्रोबियल पेंट मटेरियल ठरेल सामर्थ्यवान
  • हा पेंट दीर्घकालीन उपयोगी असून तो सुरक्षित आणि पर्यावरणपूरकही आहे
  • सतत सोडल्या जाणाऱ्या आरओएसमुळे जीवाणू, बुरशी आणि विषाणूंच्या विस्तृत स्पेक्‍ट्रमविरूद्ध लढण्याची क्षमता निर्माण होऊन विषाणू मृत पावतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com