बुद्धीजीवी वर्गाचा उमेदवारही बुद्धजीवीच असावा : श्रीमंत कोकोटे

shrimant kokate2.jpg
shrimant kokate2.jpg

 सोलापूर : विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असून ते बुद्धीजीवी वर्गांसाठी आहे. पदवीधर हा बुद्धीजीवी वर्ग आहे. त्यांचा प्रतिनिधीही बुद्धीजीवीच असावा, असे मत पदवीधर मतदारसंघाचे उमदेवार श्रीमंत कोकोटे यांनी व्यक्त केले. "सकाळ'च्या कार्यालयास रविवारी दिलेल्या सदिच्छा भेटप्रसंगी ते बोलत होते. 

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही साखर कारखान्यांची निवडणूक नसून पदवीधरांचे प्रश्‍न व साखर कारखान्यांचे प्रश्‍न यात फरक आहे. इतर पक्षांने साखर कारखानदारांना प्राधान्य दिले आहे. मात्र, मी पदवीधरांच्या समस्या घेऊन लढण्यासाठी या निवडणुकीत उभा आहे. मागील वीस वर्षांपासून मी भूमिका घेऊन लढत आहे. चळवळीतून, जनसामान्यातून पुढे येत पदवीधरांच्या विकासासाठी मी लढत आहे, असे त्यांनी सांगितले. 
स्पर्धेतील इतर उमेदवारांच्या मेळाव्याला नेते उपस्थित आहेत. मात्र, माझ्या मेळाव्यात पदवीधर सहभागी आहेत. मी पदवीधरांच्या समस्या घेऊन निघालो आहे. जुनी पेन्शन योजना, पदवीधर विकास महामंडळ, पदवीधरांना शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळावे, शाळेच्या मान्यतेबरोबरच शाळेला शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, शिक्षकाच्या नियुक्तीबरोबरच त्याला संपूर्ण वेतन मिळावे, हे प्रश्‍न मांडण्यासाठी विधान परिषदेत पदवीधरांच्या हक्काचा प्रतिनिधी असावा, यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पंचवीस हजार प्राध्यापकांच्या जागा महाराष्ट्रात रिक्त आहेत, त्या भरण्यात याव्यात. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यपकांसाठी किमान पन्नास हजार वेतन देण्यात यावे. वकिलांसाठी ऍडव्होकट वेलफेअर ऍक्‍ट 2001 लागू करावा. वकिलांना प्रशस्त चेंबर मिळावेत, इ-लायब्ररी, स्वच्छ प्रसाधनगृह अशा सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागण्यासाठी आपल लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

सर्वाधिक पदव्या घेतलेला उमेदवार 
प्रत्येक निवडणुकीत श्रीमंत उमेदवारांची नावे प्रसिद्धीच्या झोतात असतात. मात्र, पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे हे चर्चेत आहेत ते त्यांच्या सर्वाधिक पदव्यांमुळे. सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास संशोधक असलेल्या श्रीमंत कोकाटे यांच्याकडे शिवचरित्रावरील पी.एचडीसह बारा पदव्या आहेत तसेच ते पाच विषयातील डिप्लोमाधारक आहेत. पदव्यांच्या "श्रीमंती'साठी समाज माध्यमातून ते सध्या चांगलेच गाजत आहेत. 

श्री. कोकाटे यांनी मांडलेले मुद्दे 

  • - ऍडव्होकेट वेलफेअर फंडचा उपयोग पूर्णपणे व्हावा 
  • - अंशकालिन कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घ्यावे 
  • - इतिहासाचे पूर्नलेखन व्हावे 
  • - बेरोजगारी भत्ता वाढवण्यात यावा 
  • - अवर्षणग्रस्त भागात तरुणांसाठी ऍग्रोबेस इंडस्ट्रीज व्हाव्यात 
  • - महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी शिक्षक दिन साजरा व्हावा 
  • - नविन शैक्षणिक धोरणात इंग्रजी विषयाची सक्ती नसणे चुकीचे 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com