‘एसबीआय’मधून पैसे काढायचेत तर ही बातमी जरुर वाचा (Video)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

तिवारी म्हणाले,  बँकेत गर्दी होऊ नये म्हणून बँकेने नियोजन केले आहे. त्यासाठी बॅंकेत व बॅंकेच्या बाहेर तीन- तीन फुटांवर मार्कींग केलेले आहे. उन्हामुळे शाखेच्या बाहेर मंडप टाकण्यात आलेले आहेत. ग्राहकांना हात धुण्यासाठी सॅनिटाझयर, साबण व पाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. सरकारच्या नियमांचे पालन करत बॅंकेत एका वेळेस तीन ते चार ग्राहकांनाच प्रवेश दिला जात आहे.

सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आर्थीक मदत म्हणून सरकारने बॅंकेत जनधन व प्रधामंत्री सम्नान योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात ५०० रुपये जमा केली आहेत.  हे पैसे काढण्यासाठी बँकामध्ये अनेक ग्राहकांची गर्दी होत आहे. यामुळे गर्दी नियंत्राणात ठेवणे आणि ग्रामहकांना पैसे देणे या दोन्ही प्रश्‍नात बँकांची वाटचाल सुरु आहे. याच दृष्टीने सोलापुर जिल्ह्यात स्टेट बँकेने काय उपाय योजना केल्या आहेत. याची माहिती बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक अभिय तिवारी यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली आहे. 
तिवारी म्हणाले,  बँकेत गर्दी होऊ नये म्हणून बँकेने नियोजन केले आहे. त्यासाठी बॅंकेत व बॅंकेच्या बाहेर तीन- तीन फुटांवर मार्कींग केलेले आहे. उन्हामुळे शाखेच्या बाहेर मंडप टाकण्यात आलेले आहेत. ग्राहकांना हात धुण्यासाठी सॅनिटाझयर, साबण व पाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. सरकारच्या नियमांचे पालन करत बॅंकेत एका वेळेस तीन ते चार ग्राहकांनाच प्रवेश दिला जात आहे. बॅंकेची वेळ  10 ते 2 वाजेपर्यंतची असली तरी दोन वाजेपर्यंत येणाऱ्या ग्राहकांना टोकण देऊन काऊंटर वाढवलेले आहेत.
बँकेच्या स्थितीबाबत माहिती देताना ते म्हणाले, एसबीआयचे जिल्ह्यात 73 एटीएम व 23 सीडीएम मशिन आहेत, याबरोबर 194 ग्राहक सेवा केंद्र आहेत. जेथे आमचे पीओएस मशिन आहेत, जसे पेट्रोल पंप, दुकाने यांच्याकडे देखील ग्राहकांना 2000 रुपया पर्यंतची रक्‍कम काढता येते. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी व ग्राहकांनी बॅंकेत येऊन गर्दीकरण्यापेक्षा आपल्या घराजवळच्या एटीएम, सीएसपी, पीओएस सेवाचा व सुविधांचा लाभ घ्यावा. यावेळी उपप्रबंधक अनंत दिवाणजी उपस्थित होते. ते म्हणाले, जनधन योजनेत जमा झालेले पैसे ९ तारखेनंतरही ग्राहक काढू शकतात. खाते नंबरनुसार पैसे जमा होत असल्याने ग्राहकांच्या मनात भिती आहे. मात्र, ते पैसे पुन्हा ही काढता येऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interaction with Solapur SBI Zonal Manager