का साजरा करतात मराठी राजभाषा दिन... (Video)

अशोक मुरूमकर
Thursday, 27 February 2020

"विशाखा'सारखा कवितासंग्रह लिहून त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हिमरेषा असेल किंवा नटसम्राट यासारखे नाटक किंवा वैष्णवसारखी कादंबरी असेल अशा अतिशय नावीन्यपूर्ण मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम कुसुमाग्रज यांनी केले.

सोलापूर : मराठी भाषेचा उत्सव हा आपल्या जगण्याचा आणि सांस्कृतिक महोत्सव असतो. मुकुंदराज, संत ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकाराम, मुक्ताबाई या सर्व संतांनी आणि त्यानंतर मराठी साहित्यचा ठेवा अतिशय चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी तर मराठी भाषा ही राजभाषा व्हावी म्हणून तेवढे सामर्थ्य त्यांच्या लेखणीच्या सामर्थ्याने प्राप्त झाले आहे, असे मत वालचंद महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. हनुमंत मते यांनी मराठी भाषा दिनानिमित्त ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

"विशाखा'सारखा कवितासंग्रह लिहून त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हिमरेषा असेल किंवा नटसम्राट यासारखे नाटक किंवा वैष्णवसारखी कादंबरी असेल अशा अतिशय नावीन्यपूर्ण मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम कुसुमाग्रज यांनी केले. मराठी भाषेकडे वळून पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनेकांच्या माना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या रूपाने आणि जागतिकतेच्या रूपाने उंचावण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. पण आज मराठी भाषेची गळचेपी होते की काय असा अनेकांच्या पुढे मोठा प्रश्‍न निर्माण होत आहे. आपली मराठी भाषा जगवायची असेल तर पहिल्यांदा तीन गोष्टी करायला हव्यात. स्वत:, शिक्षक आणि समाज या तीन लोकांनी मराठी भाषेकडे चांगल्या पद्धतीने विधायक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज जगात 26 हजार भाषा बोलल्या जातात. सोलापुरातला आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सोलापुरात अनेक भाषा बोलल्या जातात. ज्यांना जास्त भाषा येतात तो खऱ्या अर्थाने चांगला भाषिक असे मी म्हणेल. कारण आपण ज्या भाषेत जन्मलो त्या भाषेचा तर आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे. पण इतरही भाषा आल्या म्हणून त्याचं न्यूनगंड असता कामा नये. कारण मराठी ही भाषा अशी आहे की, ज्यामध्ये काव्याचा सुंदर असं लेणं आहे. म्हणीचं सुंदर लेणं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात भाषेचा अर्थ चांगल्या प्रकारे जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interaction with Votes on Marathi Language Day