नागरी बॅंकांना भागभांडवलाची रक्कम परत करण्याबाबत सुचना जारी ; रिझर्व्ह बॅंकेचे आदेश 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 13 January 2021

या बाबत माहिती अशी, काही महिन्यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने या संदर्भात विशेष आदेश काढले होते. त्यानुसार भागभांडवल धारकांचे भाग रक्कम परत देऊ नयेत असे या आदेशात म्हटले होते. नागरी सहकारी बॅंकामध्ये कर्ज घेताना कर्जदाराकडून एकूण कर्ज रकमेच्या अडीच टक्के भाग भांडवल म्हणून जमा करावी लागते. हे भाग भांडवल परत करण्यास या आदेशाने अडचण झालेली होती. त्यामुळे भागधारकांची चांगलीच कुचंबना झालेली होती. त्यांना त्यांचे भागभांडवलाची रक्कम परत मिळण्यास अडचणी वाढल्या होत्या. ज्या कर्जदारांनी त्यांची कर्जाच्या रकमेची परतफेड केली त्यांना भाग भांडवलाची रक्कम परत मिळत नव्हती. 
 
सोलापूरः रिझर्व्ह बॅंकेने नागरी सहकारी बॅंकाकडे असलेली भागभांडवलाची रक्कम मागणी करणार्या भागधारकांना  परत करण्याच्या सुचना बुधवारी (ता.13) दिल्या आहेत. त्यामुळे कर्जफेड केल्यानंतर भागभांडवलाची रक्कम परत मिळावी या प्रतिक्षेत असलेल्या अनेक भागधारकांना दिलासा मिळाला आहे. तसेच नागरी बॅंकाकडे पून्हा एकदा कर्जाचे नियमित व्यवहार होण्यास चालना मिळणार आहे. 

हेही वाचाः कोरोनावरील लस आज येणार ! जनजागृतीसाठी शिक्षकांची घेणार मदत 

या बाबत माहिती अशी, काही महिन्यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने या संदर्भात विशेष आदेश काढले होते. त्यानुसार भागभांडवल धारकांचे भाग रक्कम परत देऊ नयेत असे या आदेशात म्हटले होते. नागरी सहकारी बॅंकामध्ये कर्ज घेताना कर्जदाराकडून एकूण कर्ज रकमेच्या अडीच टक्के भाग भांडवल म्हणून जमा करावी लागते. हे भाग भांडवल परत करण्यास या आदेशाने अडचण झालेली होती. त्यामुळे भागधारकांची चांगलीच कुचंबना झालेली होती. त्यांना त्यांचे भागभांडवलाची रक्कम परत मिळण्यास अडचणी वाढल्या होत्या. ज्या कर्जदारांनी त्यांची कर्जाच्या रकमेची परतफेड केली त्यांना भाग भांडवलाची रक्कम परत मिळत नव्हती. 
याशिवाय भाग खरेदी करणाऱ्या भाग धारकांना लाभांशाची रक्कम वितरित करण्याबाबत देखील बंदी घालण्यात आलेली होती. संपलेल्या आर्थिक वर्षात भागधारक सदस्यांना लाभाशांची रक्कम देखील दिली गेली नाही. 
आज या बाबत रिझर्व्ह बॅंकेने विशेष आदेश काढून नागरी सहकारी बॅंकांना सुचना दिली आहे. त्यानुसार भागधारकांना त्यांच्या मागणीनुसार भाग भांडवलाची रक्कम परत घेता येणार आहे. हे आदेश ज्या बॅंकाचा सीआरएआर (कॅपिटल रिस्क ऍसेट रेशो) हा नऊ टक्के किंवा त्या पेक्षा अधिक आहे त्या बॅंकांना लागू आहे. या मुळे नागरी सहकारी बॅंकांना त्यांच्या कर्ज पुरवठयासाठी मोठाच दिलासा मिळणार आहे. अजुनही सभासदांना लाभांश देण्याबाबत बंदी कायम आहे. 

दिलासा देणारा निर्णय 
रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे नागरी सहकारी बॅंकांना दिलासा मिळाला आहे. तसेच कर्जदारांना कर्ज देण्याच्या दृष्टीने हा निर्णय कर्जवाटपाच्या कामाला चालना देणारा आहे. 
- राज मिणियार, सीए, माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक, जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन, सोलापूर  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Issuance of instructions to return share capital to civic banks; Order of the Reserve Bank