जयहिंद शुगरचे बॉयलर अग्नी प्रदीपनः अकरा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट 

jayhind suger.jpg
jayhind suger.jpg

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्‍यासह कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनी आपला ऊस चालू गळीत हंगामात जयहिंद शुगरला टाकून आपले आर्थिक हित साधून कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन सदर जयहिंद कारखाना सुरु होण्याने शेतकरी वर्गाचा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. चांगला दर आणि विश्वासपूर्ण व्यवहार आणि शेतकर्यांशी बांधिलकी यामुळे येत्या गळीत हंगामात सर्वांनी आपला ऊस जयहिंद शुगरला घालावेत असे मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. 

यावेळी बोलताना कार्यकारी निर्देशक बब्रुवाहन माने देशमुख म्हणाले की चालू हंगाम सुरू करण्यासाठी अध्यक्ष गणेश माने देशमुख यांच्या कार्यकुशलतेने कारखाना पूर्ण सज्ज झाला असून यावेळी सुमारे अकरा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.जयहिंद कारखाना सुरू झाल्यापासून सभासद बरोबर विश्वास संपादन केला असून आजपर्यंत पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू राहिलेला आहे. येत्या हंगामात चांगला कारखाना चालवून सभासदाना चांगला दर देण्यात येईल असे माने देशमुख यांनी स्पष्ट केले. 

कारखाना प्रगतीबाबत अधिक माहिती देताना उपाध्यक्ष विक्रमसिंह पाटील म्हणाले की यावेळी कारखान्याकडे अक्कलकोट, दक्षिण व उत्तर सोलापूर,मोहोळ व तुळजापूर आदी भागातून सुमारे 23 हजार मेट्रिक टन एवढ्या उसाची नोंद आहे. सध्याची गाळप क्षमता दररोज 4900 मेट्रिक टन एवढी असून तो 5500 या क्षमतेने चालत असतो. कारखान्याचे विस्तारीकरण काम वेगाने सुरू असून येत्या डिसेंबर अखेर पर्यंत दररोज अकरा हजार मेट्रिक टन एवढ्या क्षमतेने कारखाना सुरू होणार आहे.त्यामुळे कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळपास जाण्यास कोणतीही अडचण येणार आहे. यावेळी झालेली होमहवन पुजा संतोष शरणप्पा आळगी (जकापूर),नंदकुमार दरीबा व्हनगर (ढोकबाभुळगाव)या दांपत्याच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बब्रुवाहन माने देशमुख, विक्रमसिंह पाटील, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, शेतकी अधिकारी राजेंद्र जेऊरे, कमल कनन, अमोल जगताप, राहुल घोगरे, शिवकुमार पाटील, प्रकाश बिगडे, गोरक्षनाथ पवार, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


सभासदांचे सहकार्य महत्वाचे 
चालू हंगामात कारखाना दसरा सणाच्या मुहूर्तावर सुरू केले जाणार आहे. यावेळी 11 लाख साखर उत्पादन करण्याचे उद्दिष्ट्य आहे आणि 11 कोटी युनिट विजेची निर्मिती करून महावितरण विभागास विक्री करण्यात आली आहे. आता सुरू असलेले 18 मेगावॅट को- जन प्लॅंट हा मेगावॅट या विस्ताराने सुरू करण्यात आला आहे. सभासदानी मोठया प्रमाणावर ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे. 

- बब्रुवाहन माने देशमुख,कार्यकारी निर्देशक,जयहिंद शुगर 

संपादनः प्रकाश सनपूरकर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com