esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad became angry at Prime Minister Modi

जगभर सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यातच देश लॉकडाऊन आहे. कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. तरी कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चिन्ह आहे. जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.

देशाला इतकेही मुर्खात काढू नका; मोदींनी केलेल्या आवाहनावर आव्हाड संतापले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना त्यांनी देशवासीयांकडे ९ मिनिटांचा वेळ मागितला आणि ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचं आवाहन केलं. मात्र यावर राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेटमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड संतापले आहेत. याबाबत त्यांनी केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जगभर सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यातच देश लॉकडाऊन आहे. कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. तरी कोरोना आटोक्यात येत नसल्याचे चिन्ह आहे. जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरच्या पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.
आ्व्हाड यांनी मोंदीनी संवाद साधल्यानंतर व्हिडीओ केला आहे. त्यानंतर त्यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, 'भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही, असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मूर्खात काढू नका,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले?
भारताने दाखवलेलं धैर्य अनेक देशांसाठी आदर्श आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी मोठं सहकार्य केलं. हा सरकार आणि लोकांचा सामूहिक लढा आहे. तुम्ही कोणीही एकटे नसून आपण सगळे एकत्र आहोत. जनतेने २२ मार्चला जनता कर्फ्यूचं पालन केलं. त्यासाठीही मोदींनी पुन्हा एकदा जनतेचे आभार मानले आहेत.
५ एप्रिलला सगळ्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र यायचं आहे. १३० करोड देशवासीयांच्या शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे. मला रात्री ९ वाजता सगळ्यांचे ९ मिनिट हवं आहेत. यावेळी आपण घरातील सगळ्या लाईट बंद करू आणि सगळे घराच्या दारात उभे राहून मेणबत्ती, दिवा, मोबाईलची लाईट लावू. या वेळी घरातील सर्व लाईट बंद असतील. तेव्हा प्रकाशाच्या या महाशक्तीचा जागर होईल आणि सगळ्यांची एकता दिसेल,' असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे.

go to top