#कोरोना : पोलिसांनी चालू केली कारवाई; घराबाहेर पडू नका!

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 23 मार्च 2020

रविवारच्या जनता कर्फ्यूला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालनही नागरिकांनी करायला हवे. सोमवारपासून 31 मार्चपर्यंत 144 कलम लावण्यात आले आहे. यात अत्यावश्‍यक सुविधा वगळता इतर दुकाने बंद असतील. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन होत आहे. सोमवारी सकाळपासून सगळीकडेच नियमीतपणे वर्दळ सुरु असून सोलापूरकर स्वत:सह इतरांचा जीव धोक्‍यात घालत असल्याचे दिसून येत आहे. दुपारी बारानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाईला सुरवात केल्याचे चित्र आहे. 

शहर आणि जिल्ह्यात 144 कलमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पाचपेक्षा अधिकजण एकत्र आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले आहे. अत्यावश्‍यक वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून दुकाने चालू ठेवल्याप्रकरणात आजवर शेकडो जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सोमवारी पहाटे संचारबंदीची मुदत संपली. सकाळपासूनच सर्वत्र नियमीतपणे वर्दळ दिसून येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेकजण दक्षता घेत नसल्याचे दिसून येत आहे. दुपारी बारानंतर पोलिसांनी कारवाईला सुरवात केली आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांवर, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. 

रविवारच्या जनता कर्फ्यूला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालनही नागरिकांनी करायला हवे. सोमवारपासून 31 मार्चपर्यंत 144 कलम लावण्यात आले आहे. यात अत्यावश्‍यक सुविधा वगळता इतर दुकाने बंद असतील. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्त

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalam 144 karwai at solapur