अनुकरणीय : तरुण शेतकऱ्याचा सोशल मीडियाद्वारे मार्केटिंग फंडा; थेट पेरू विक्रीतून मिळवतोय दोन लाख रुपये! 

गजेंद्र पोळ 
Tuesday, 28 July 2020

सध्या शेतकऱ्यांची सुशिक्षित मुलांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये नवनवीन पिकांचे भरघोस उत्पादन घेतल्याचे प्रयोग आपण पाहतो. परंतु शेतामध्ये पिकवलेल्या मालाचे मार्केटिंग व्यवस्थित करता येत नसल्याने व अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने हे तरुण निराश होतात. परंतु केडगाव येथील जिद्दी तरुण शेतकरी ज्ञानेश्वर माळी यांनी आपल्या शेतातील उत्पादित पेरूला अपेक्षित दर मिळत नसल्याने स्वतः शेतकरी ते ग्राहक मार्केटिंग करण्याचा निर्णय घेऊन या अडचणीवर मात केली आहे. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग करत पेरूची विक्री सुरू केली असून, ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चिखलठाण (सोलापूर) : केडगाव (ता. करमाळा) येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर माळी यांच्या शेतात पिकलेल्या पेरू विक्रीसाठी अडचणी येत असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत त्यांनी शेतकरी ते ग्राहक अशी घरपोच सेवा सुरू केली आहे. या सेवेला ग्राहकांमधून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारा आहे. 

हेही वाचा : मोठी बातमी! समाधानकारक पावसामुळे यंदा टॅंकरच्या खर्चात झाली "इतक्‍या' कोटींची बचत; सध्या सुरू आहेत "या' गावांमध्ये टॅंकर 

सध्या शेतकऱ्यांची सुशिक्षित मुलांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये नवनवीन पिकांचे भरघोस उत्पादन घेतल्याचे प्रयोग आपण पाहतो. परंतु शेतामध्ये पिकवलेल्या मालाचे मार्केटिंग व्यवस्थित करता येत नसल्याने व अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने हे तरुण निराश होतात. परंतु केडगाव येथील जिद्दी तरुण शेतकरी ज्ञानेश्वर माळी यांनी आपल्या शेतातील उत्पादित पेरूला अपेक्षित दर मिळत नसल्याने स्वतः शेतकरी ते ग्राहक मार्केटिंग करण्याचा निर्णय घेऊन या अडचणीवर मात केली आहे. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग करत पेरूची विक्री सुरू केली असून, ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हेही वाचा : बापरे..! कोरोनाबाधित डॉक्‍टरच थेट घरी आला अन्‌ गोंधळ उडाला; अखेर विलगीकरण कक्षात केली रवानगी मात्र गावकऱ्यांना घाम फुटला 

त्यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये लखनऊ 45 या जातीच्या पेरूची लागवड गेल्या सप्टेंबर महिन्यात केली होती. लागवडीनंतर आवश्‍यक मशागत व खते वेळोवेळी दिल्यानंतर 10 महिन्यांतच भरघोस पीक उभे राहिले. सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये या पिकाला अपेक्षित दर मिळत नाही. व्यापारी फारच कमी दराने खरेदी करत असल्याने दोन एकरात जास्तीत जास्त 40 ते 50 हजार रुपये उत्पन्न मिळाले असते. शेवटी त्यांनी स्वतः शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीने पेरू विक्री करण्याचा निर्णय घेतला. आपल्या स्वादिष्ट व रुचकर अशा पेरूची त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात सुरू केली. मित्रमंडळींनी या ग्रुपवरून ग्राहकांपर्यंत त्यांची जाहिरात पोचवण्याचा प्रयत्न केला आणि सध्या जेऊर, चिखलठाण परिसरातून त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत मोबाईलवरून अनेक लोक त्यांना पेरूची मागणी करत आहेत. आपल्या शेतातील पेरूचे वजन करून व्यवस्थित पॅकिंग करून ते त्या ग्राहकांपर्यंत घरपोच सेवा देत असल्याने दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळणे सहजशक्‍य होणार आहे. 

पेरूच्या मार्केटिंगबाबत ज्ञानेश्वर माळी म्हणाले, माझ्याकडे पाच एकर क्षेत्रावर निंबोणी आहे. यावर्षी उन्हाळ्यात लॉकडाउनमुळे त्याला फारसा दर मिळाला नाही. सर्व मालही विकू शकलो नाही. पाच लाख रुपयांचे नुकसान झाले होते. सध्या दोन एकर क्षेत्रावर पेरू काढणीला आला आहे. निंबोणीसारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सोशल मीडियाचा मार्केटिंगसाठी वापर करून पेरूचे व्यवस्थित पॅंकिंग करून स्वतः घरपोच करत असल्याने योग्य दर मिळून लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kedgaon farmer marketing Guava through social media, earning rs 2 lakh