मोठी बातमी! समाधानकारक पावसामुळे यंदा टॅंकरच्या खर्चात झाली "इतक्‍या' कोटींची बचत; सध्या सुरू आहेत "या' गावांमध्ये टॅंकर 

तात्या लांडगे
Tuesday, 28 July 2020

हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्‍त करूनही मागच्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. तर नागरिकांची तहान भागविण्यासाठी गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर टॅंकर सुरू करावे लागले. बळिराजासह नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. मात्र, यंदा मॉन्सूनच्या आगमनापासून सरासरीच्या तुलनेत विशेषत: दुष्काळ पट्ट्यात अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या घटली आणि राज्याच्या तिजोरीवरील भार कमी होण्यास मोठी मदत झाली. 

सोलापूर : राज्यात मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने 29 जुलैपर्यंत तब्बल चार हजार 293 टॅंकर सुरू होते. या टॅंकरच्या माध्यमातून तीन हजार 353 गावे आणि साडेआठ हजार वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात होता. या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील 15 गावे आणि 93 वाड्या-वस्त्यांसाठी 21 टॅंकर सुरू आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टॅंकरवरील खर्चात तब्बल 90 कोटींहून अधिक रुपयांची बचत झाली आहे. 

हेही वाचा : बापरे..! ऍप डाउनलोड करायला सांगितले अन्‌ खात्यावरून "इतकी' रक्कम गायब 

हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्‍त करूनही मागच्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला. तर नागरिकांची तहान भागविण्यासाठी गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर टॅंकर सुरू करावे लागले. बळिराजासह नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. मात्र, यंदा मॉन्सूनच्या आगमनापासून सरासरीच्या तुलनेत विशेषत: दुष्काळ पट्ट्यात अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या घटली आणि राज्याच्या तिजोरीवरील भार कमी होण्यास मोठी मदत झाली. मागील वर्षी 29 जुलैपर्यंत नाशिक जिल्ह्यात 226 टॅंकर, धुळे जिल्ह्यात 71, जळगावात 104, नगरमध्ये 682, पुणे जिल्ह्यात 182, साताऱ्यात 194, सांगलीत 191, सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येकी 390, जालन्यात 356, बीडमध्ये 699, परभणीत 63, हिंगोलीत 45, नांदेडमध्ये 131, उस्मानाबाद जिल्ह्यात 222, लातूरमध्ये 105, अमरावतीत 43, अकोल्यात 28, वाशिममध्ये 28, बुलढाण्यात 105, यवतमाळमध्ये 36 आणि नागपूर जिल्ह्यात दोन टॅंकर सुरू होते. 

हेही वाचा : जिल्हा परिषदेत "लाचलुचपत'ची रेड! आरोग्णसेविका म्हणून नियुक्ती देण्यासाठी "यांनी' घेतली 40 हजारांची लाच 

टॅंकर खर्चातील बचत 

  • जुलै 2019 पर्यंत टॅंकर : 4,293 
  • टॅंकवरील एकूण खर्च : 90.27 कोटी 
  • जुलै 2020 मधील टॅंकर : 21 
  • टॅंकरवरील एकूण खर्च : 69.40 लाख 
  • एकूण झालेली बचत : 89.87 कोटी 

"या' ठिकाणी सुरू आहेत टॅंकर 
राज्यातील नगर जिल्ह्यातील एका गावात आणि तीन वाड्यांसाठी तीन टॅंकर सुरू आहेत. तर पुणे जिल्ह्यातील दोन गावे आणि नऊ वाड्यांवर एक, अमरावतीतील एका गावात एक, तर सांगलीतील सहा गावे आणि 81 वाड्या-वस्त्यांवर सर्वाधिक 11 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच गावांसाठी पाच टॅंकर आणि अमरावती जिल्ह्यातील एका गावात एक टॅंकर सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अव्वर सचिव गणेश पवार यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfactory rains have saved the tanker more than rs 90 crore this year