"फिजिओथेरपी'च्या माध्यमातून ठेवा हृदय निरोगी 

heart day.jpg
heart day.jpg

सोलापूर ः रक्तदाब आणि हृदयविकारापासून बचाव करणे आता सर्वांसाठीच महत्वाचे झाले आहे. दररोज व्यायामासाठी 30 ते 60 मिनिटे दिल्यास या तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होणार आहे. हृदयाची पर्यायाने शरिराची व्यवस्थित निगा ठेवण्यासाठी फिजीओथेरपिस्ट मुख्य भूमिका बजावतात ऱ्हदयाची सहनशक्ती आणि धमनी रक्त प्रवाह वाढविता येतात. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यक्तींसाठी फिजिओथेरपिस्टद्वारे ऱ्हदय विकाराचा धोका कमी करता येतो. धावणे, रोइंग करणे, सायकल चालविणे, व्यायाम, आहाराचे नियोजन या माध्यमातून हृदयाची निगा व्यवस्थितपणे ठेवता येते, असा सल्ला आधार फिजिओथेरपीचे डॉ. विनोद शेळके यांनी दिला. 

डॉ. शेळके म्हणाले, हृदयाशी निगडित असलेल्या आजारांच्या आकडेवारीत गेल्या काही वर्षात चिंताजनक वाढ झाली आहे. व्यक्ती शहरी भागातील असो की ग्रामीण भागातील आता प्रत्येकाला हृदयविकार होऊ लागला आहे. गेल्या 30 वर्षांत या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. हृदयाशी निगडीत असलेल्या आजारांमध्ये 1990 पासून पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे हृदयाची निगा राखणे हे आता सर्वांसाठीच अत्यावश्‍यक झाले आहे. हृदय विकारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आहे. अस्वस्थ आहार, शारीरिक निष्क्रियता, तंबाखूचे सेवन, मद्यपान या मुळे ऱ्हदय विकाराचा विळखा दिवसेंदिवस अधिक जटिल होत चालला आहे. 

रक्तदाब वाढवल्यामुळे, रक्तातील गुल्कोज वाढतो. त्यामुळे जास्त वजन वाढते, लठ्ठपणा येतो. त्याचा विपरित परिणाम हृदयावर होतो. 
हृदयविकाराचा झटका येणे या घटना आता सर्रास घडू लागल्या आहेत. छातीच्या मध्यभागी वेदना होतात. अस्वस्थ वाटणे, हात, डावा खांदा, कोपर, जबडा किंवा मागे वेदना होतात. या शिवाय ऱ्हदय विकाराचा झटका आलेल्या व्यक्तीस श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो किंवा धापही लागते. आजारी पडणे किंवा उलट्या होणे, घाम येणे, मळमळ होणे, उलट्या होणे अशी लक्षणे दिसू शकतात. बदललेल्या जीवनशैलीचाही परिणाम हृदयावर होऊ लागला आहे. धकाधकीच्या जीवनात आता सर्वांसाठी सकारात्मक जीवनशैली आवश्‍यक आहे. या शिवाय निर्व्यसनी राहणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. चांगला सकस आहार, नियमितपणे व्यायाम आवश्‍यक आहे. हृदय रोगाची सुरुवात मधुमेहापासून होत असल्याने ज्या ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. 
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन करावे. रक्तदाब, ताण-तणावाचे व्यवस्थापन, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणात ठेवणे आवश्‍यक आहे. कार्डियाक रिहॅब क्‍लासेसमध्ये व्यायाम, शिक्षण आणि जास्त एरोबिकच्या 40 टक्‍क्‍याच्या तीव्रतेने शारिरीक क्रियाकलाप केले जाते. प्रत्येक चयापचय समकक्ष वाढीसाठी एरोबिक फिटनेसमध्ये मदत होते. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com