मोठी ब्रेकिंग ! नरभक्षक बिबट्याला मारले ठार; मृत बिबट्याचे सोलापुरात शवविच्छेदन 

तात्या लांडगे
Friday, 18 December 2020

ठळक बाबी... 

  • नरभक्षक बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळ्या झाडून केले ठार 
  • वांगी क्र. चार येथील राखुंडे यांच्या केळीच्या बागेत सापडला बिबट्या 
  • उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी घटनास्थळी धाव 
  • मृत बिबट्याला घेऊन वन विभाग परतले; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्‍विास

सोलापूर : बीड, नगरमार्गे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यात आलेल्या नरभक्षक बिबट्याने तिघांचा जीव घेतला. नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी मुख्य प्रधान वनसंरक्षकांनी गोळ्या घालून ठार करण्यास परवानगी दिली. त्यानंतर शंभरहून अधिक बंदुकधारी कर्मचारी बिबट्याच्या मागावर होते. आज (शुक्रवारी) सायंकाळी सहा ते सव्वासहाच्या सुमारास वांगी क्र. चार येथील राखुंडे यांच्या केळीच्या बागेत थांबलेल्या बिबट्याला गोळ्या घालून ठार केले. पांडूरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्या थांबला होता. 

ठळक बाबी... 

  • नरभक्षक बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळ्या झाडून केले ठार 
  • वांगी क्र. चार येथील राखुंडे यांच्या केळीच्या बागेत सापडला बिबट्या 
  • उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी घटनास्थळी धाव 
  • मृत बिबट्याला घेऊन वन विभाग परतले; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्‍विास

 

नरभक्षक बिबट्यामुळे करमाळा, माढा तालुक्‍यात दहशतीचे वातावरण होते. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले होते. बिबट्याला ठार मारण्याच्या दृष्टीने आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील यांनीही बिबट्याला पकडण्यासाठी व ठार करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. आज नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश मिळाले.

 

मृत बिबट्याचे सोलापुरात शवविच्छेदन 

वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे. करमाळ्यातील वांगी क्र. चार येथे त्याला गोळ्या घालून ठार मारले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून त्याठिकाणी मृत बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली आहे. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला घेऊन सोलापुरकडे रवाना झाले आहेत. सोलापुरात बिबट्याचे शवविच्छेदन होईल, अशी माहिती श्री. पाटील यांनी सकाळशी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The killed the leopard