सोलापूर : पोलिसांमधील केस मागे घेण्याच्या कारणावरून महिलेसह तिच्या पतीवर चाकू हल्ला करणाऱ्यां चौघांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पद्मीनी रत्नाकर येळणे वय 28 रा किसान नगर, ब्रम्ह अंबिका मंदीरासमोर, अक्कलकोट रोड, सोलापूर या महिलेच्या फिर्यादीवरुन निर्भय लिंगराज गायकवाड, ललिता लिंगराज गायकवाड, प्रांजली लिंगराज गायकवाड आणि संगिता निर्भय गायकवाड सर्व रा. किसान नगर, अक्कलकोट रोड सोलापूर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पद्मीपी येळणे यांच्याशी निर्भय गायकवाड याने गैरवर्तन केले होते. त्यामुळे याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर निर्भय यास अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर निर्भय हा ही केस मागे घेण्यासाठी पद्मीनी यांच्यावर दबाव आणून शिवीगाळ करीत होता. याचाच राग मनात धरून निर्भय गायकवाड व त्याच्या घरातील लोकांनी मारहाण केली. त्यावेळी पद्मीनी या त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून पोलिस ठाण्याकडे तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना खाली पाडून कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच निर्भय गायकवाड याने स्वत:च्या हातावरदेखील वार करून घेऊन तुम्हांला केस करुन अडकवतो अशी धमकी दिली. म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.