असाही निर्णय ! प्रवासी नसल्यास जागेवरच थांबणार लालपरी 

st bus
st bus
Updated on

सोलापूर : उन्ह असो की पाऊस, सर्वच ऋतूंमध्ये सर्वसामान्यांसाठी लालपरी खेड्यापाड्यापर्यंत सेवा देत आहे. मात्र, खासगी बेशिस्त वाहतुकीमुळे लालपरीची मागील काही वर्षांपासून दरवर्षी अंदाजित सहाशे कोटींचा आर्थिक भुर्दंड सोसत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता लांब पल्ल्याच्या एसटी बसमध्ये पुरेसे प्रवासी नसल्यास संबंधित बस जागेवरच थांबविली जाणार असून समाधानकारक प्रवाशी मिळाल्यानंतरच ती हलविली जाणार आहे. त्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. 


चालक, वाहकांसह लालपरीत पाच ते दहा प्रवासी असतानाही बस नियोजित वेळेनुसार धावतात. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच मोठा होवू लागला आहे. दुसरीकडे 
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सोळा हजार बस असून त्यासाठी एक लाख तीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. इंधन, दुरुस्ती, वेतनावरील खर्चाच्या तुलनेत खर्चच वाढला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावरच लालपरीची वाटचाल सुरु आहे. मागील काही वर्षांपासून लालपरी आर्थिक अडचणीची शर्यत पार करीत प्रवाशांची सेवा करीत आहे. राज्यातील बहूतांश खेड्यापाड्यापर्यंत पोहचलेली लालपरी आता आर्थिक अडचणींचा सामना करीत असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मार्च ते एप्रिल या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर उत्पन्न वाढीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक विभागांना उत्पन्न वाढीचे उद्दिष्टे देण्यात आले असून उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या विभागांना दरमहा दोन लाखांचे बक्षिसही दिले जाणार आहे. 


राज्य परिवहन महामंडळाचा पसारा 
एकूण विभाग 
31 
एकूण बस 
16,000 
कर्मचारी 
1.04 लाख 
दरवर्षीचा सरासरी भुर्दंड 
600 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com