वळसे-पाटलांचे सिद्धेश्‍वरच्या चिमणीला जीवदान? 

walse patil photo
walse patil photo
Updated on

सोलापूर : होटगी रोडवरील विमानतळावरील विमानसेवा आणि सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी असे दोन्ही प्रश्‍न एकमेकात गुंतलेले आहेत. विमानसेवेसोबतच कारखान्यावर अवलंबून असलेले कामगार, शेतकरी यांचाही विचार करावा लागेल. दोन्ही प्रश्‍नांचा विचार करून त्यातून मार्ग काढावा लागेल अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीला पालकमंत्री वळसे-पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या जीवदान दिले आहे. 
हेही वाचा - जुळे सोलापूरकरांचा संताप...अन्यथा महापालिकेचा कर भरणार नाही 
सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर पालकमंत्री वळसे-पाटील यांनी आज दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बोरामणी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. बोरामणी विमानतळाच्या माध्यमातून सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्‍न सोडविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहेत. बोरामणीचे विमानतळ पूर्ण होऊन येथून विमानसेवा सुरू होईपर्यंत होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करता येईल का? याबाबत पालकमंत्री वळसे-पाटील यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. 
हेही वाचा - भर रस्त्यात धावत्या कंटेनरने घेतला पेट 
होटगी रोडवरील विमानतळावरून छोटी विमाने चालण्यास अडचण नाही. मोठ्या विमानांसाठी चिमणीचा अडथळा आहे. लहान विमानांसाठी चिमणीचा अडथळा नाही. या ठिकाणी सध्या लहान खासगी विमाने या ठिकाणी उतरतात. होटगीरोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी सध्या प्रस्ताव नसल्याचेही पालकमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com