पंढरपुरात स्वीकृत नगरसेवकपदासाठी लॉबिंग 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पंढरपूर येथील नगरपालिकेच्या तीन स्वीकृत नगरसवेकांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. रिक्त स्वीकृत नगरसेवकपदासाठी परिचारक गटातील अनेक इच्छुकांनी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारकांकडे लॉबिंग सुरू केले आहे.

पंढरपूर (जि. सोलापूर) ः येथील नगरपालिकेच्या तीन स्वीकृत नगरसवेकांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. रिक्त स्वीकृत नगरसेवकपदासाठी परिचारक गटातील अनेक इच्छुकांनी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारकांकडे लॉबिंग सुरू केले आहे. चार दिवसांत जवळपास 30 ते 40 कार्यकर्त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी मागणी केली आहे. इच्छुकांच्या गर्दीत स्वीकृत नगरसेवक पदाची संधी कोणाला मिळतेय, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

वाचा ः संगीता गोकुळच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर

नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा लतिका डोके यांनी अलीकडेच उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्या रिक्त पदासाठी भाजपचे नगरसेवक अनिल अभंगराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याच दिवशी शहर विकास आघाडीच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक झालेले आदित्य फत्तेपूरकर, श्रीनिवास बोरगावकर आणि मालोजी शेंबडे यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत.

वाचा ः ती सहन करतोय तोंड दाबून बुक्क्यांचा मार

तीन जागांसाठी येत्या आठवडाभरात निवड प्रक्रिया पूर्ण होईल. पालिकेत भाजपपुरस्कृत शहर विकास आघाडीचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच परिचारक गटाने तीन कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली होती. त्यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्या जागी नवीन तीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. 

वाचा ः बोरामणी विमानतळाबाबत मोठा निर्णय..

निवड प्रक्रिया जवळ आल्याने कार्यकर्त्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारकांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. 

जागा तीन इच्छुक अनेक
पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने तीन जागा रिक्त झाल्या आहेत. तीन जागांसाठी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. निवडीची तारीख अजून निश्‍चित नाही. तरीपण रोज कार्यकर्ते भेटून संधीची मागणी करत आहेत. अनेकजण फोन करूनही संपर्क साधत आहेत. आतापर्यंत जवळपास 30 हून अधिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. मागणी केलेल्या सर्व कार्यकर्त्यांची मी माझ्या मोबाईलमध्ये तशी नोंदही ठेवली आहे. 
- उमेश परिचारक, अध्यक्ष, शहर विकास आघाडी 
 

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lobbying for corporater post in pandharpur