मैत्री आणि प्रेम... 

सुस्मिता वडतिले
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

दोघेही तासन्‌तास बोलत बसत. तो दिसला नाही, तर निकिताला करमत नसे. ती अशावेळी सोनालीला विचारत असे, तो का आला नाही? येणार आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करून त्याने तिला प्रपोज केला. ती देखील हो म्हणाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

सोलापूर : निकिता गोरे आणि लक्ष्मण कबाडे यांची ही लव्हस्टोरी. दोघेही सोलापूरमध्येच राहणारे आहेत. लक्ष्मण हे त्यांच्या मित्रासोबत संगमेश्‍वर कॉलेजमध्ये जात असे. एकेदिवशी त्यांची कॉलेजमध्ये प्रथमच निकिताची भेट झाली. निकिताशी ओळख करण्यासाठी त्याने तिच्या मैत्रीण सोनालीसोबत ओळख वाढवली. तिला पाहता यावं म्हणून तो कॉलेजला दररोज येऊ लागले. दोघांचं बोलणंही वाढू लागले.

दोघेही तासन्‌तास बोलत बसत. तो दिसला नाही, तर निकिताला करमत नसे. ती अशावेळी सोनालीला विचारत असे, तो का आला नाही? येणार आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करून त्याने तिला प्रपोज केला. ती देखील हो म्हणाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 
दिवस असेच आनंदाने जात होते. त्यांचे फोनवर बोलणेही खूप वाढले. एकेदिवशी तिला तिच्या घरच्यांनी फोनवर बोलताना विचारले, काय सुरू आहे? त्या वेळी ती सर्व गोष्ट सांगितली. हे ऐकताच आई-वडिलांनी नकार दिला. घरच्यांनी नकार दिल्यामुळे ती घर सोडून बाहेर निघाली. दोघेजण शेगावला निघून गेले. यानंतर 1 डिसेंबरला दोघांनी मंदिरामध्ये विवाह केला. त्यानंतर दोघांनीही सोलापूरला येण्याचे ठरवले आणि लक्ष्मण यांच्या मोठ्या बंधूचे 15 डिसेंबर रोजी लग्न होते. त्याच दिवशी लक्ष्मण यांच्या घरच्यांनी घाईगडबडीने त्यांचेही लग्न लावले. परंतु तिच्या घरच्यांनी त्यांच्या विवाहास नकार दिला. लग्नाच्या एक ते दोन वर्षांनी तिच्या माहेरच्यांनी मान्य केले. आज त्यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी असे एकत्र सुखी संसार करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love story of Nikit Gore and Laxman Kabade