धक्कादायक..! लेकानेच केला बापाचा खून; पंधरवड्यातील या दुसऱ्या घटनेमुळे "हा' तालुका गेला हादरून 

किरण चव्हाण 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

अंजनगाव उमाटे येथील गाळे विकण्याच्या कारणावरून मुलगा व वडिलांचे भांडण झाले. वडील रमेश विठ्ठल माळी (वय 50) हे "मी गाळे विकणारच' असे म्हणाल्याच्या कारणावरून चिडलेला मुलगा गणेश रमेश माळी (वय 23) याने वडील रमेश यांच्या मानेवर बुक्कीने मारहाण केली. वडील खाली पडल्यानंतर त्यांचा गळा, नाक व तोंड दाबून त्यांना जिवे ठार मारले, अशी तक्रार मृत रमेश माळी यांची पत्नी अंजना रमेश माळी हिने माढा पोलिसांत दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने हे करीत आहेत. 

माढा (सोलापूर) : गाळे विकण्याच्या कारणावरून वडिलांचा मुलानेच तोंड व गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना अंजनगाव उमाटे (ता. माढा) येथे शुक्रवारी (ता. 31) घडली. मुलानेच वडिलांचा खून करण्याची माढा तालुक्‍यातील या पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. 

हेही वाचा : "बा विठ्ठला... मुक्‍या-बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला सुबुद्धी दे ! 

याबाबत माढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अंजनगाव उमाटे येथील गाळे विकण्याच्या कारणावरून मुलगा व वडिलांचे भांडण झाले. वडील रमेश विठ्ठल माळी (वय 50) हे "मी गाळे विकणारच' असे म्हणाल्याच्या कारणावरून चिडलेला मुलगा गणेश रमेश माळी (वय 23) याने वडील रमेश यांच्या मानेवर बुक्कीने मारहाण केली. वडील खाली पडल्यानंतर त्यांचा गळा, नाक व तोंड दाबून त्यांना जिवे ठार मारले, अशी तक्रार मृत रमेश माळी यांची पत्नी अंजना रमेश माळी हिने माढा पोलिसांत दाखल केली आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीसोबत हुकतेच शिवसेनेच्या सत्तेचे टायमिंग, सोलापूरच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची व्यथा

याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने हे करीत आहेत. माढा तालुक्‍यात या पंधरवड्यापूर्वी शिराळ (टेंभुर्णी) येथेही मुलाने वडिलाचा खून केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी घडलेल्या या दुसऱ्या घटनेतही मुलाने वडिलाचा खून केला. या दोन्ही घटनांमुळे माढा तालुका हादरून गेला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Madha taluka the boy killed his father