"मुंबई' बाजार समितीसाठी महाविकास आघाडीची गट्टी 

mahavikas logo
mahavikas logo
Updated on

सोलापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्रित आल्याने भाजप या निवडणुकीत निष्प्रभ ठरले आहे. भाजपला संधी असून या निवडणुकीत त्यांचे उमेदवार सर्व ठिकाणी मैदानात उतरू शकले नाहीत. 
हेही वाचा - सोलापूरच्या संभाव्य लोकसभा पोटनिवडणुकीबाबत सुशीलकुमार म्हणाले... 
शनिवारी (ता. 29) या बाजार समितीसाठी मतदान होणार असून या निवडणुकीत कोकण महसूल विभागातून पाच, नाशिक महसूल विभागातून आठ, पुणे महसूल विभागातून पाच, औरंगाबाद महसूल विभागातून अकरा, अमरावती व नागपूर महसूल विभागातून प्रत्येकी सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघातील 43 उमेदवारांचे नशीब 3 हजार 926 मतदारांच्या (त्या त्या जिल्ह्यातील बाजार समित्यांचे संचालक) हातात आहे. सर्वाधिक चुरस औरंगाबाद महसूल विभाग मतदारसंघात असून येथे तब्बल अकरा उमेदवार मैदानात उतरले आहेत. याशिवाय मुंबई बाजार क्षेत्रातील धान्य, डाळी खाद्यतेल व्यापारी मतदारसंघातून तीन उमेदवार रिंगणात असून या मतदारसंघात 877 मतदार आहेत. 
हेही वाचा - बळिराजासाठी गुड न्यूज : कर्जमाफीची 28 फेब्रुवारीला दुसरी यादी 
मुंबई बाजार क्षेत्रातील इतर सर्व विक्री वस्तूंचे व्यापारी या मतदारसंघातूनही तीन उमेदवार रिंगणात असून 1 हजार 78 मतदार याठिकाणी आहेत. मुंबई बाजार क्षेत्रातील भाजीपाला व्यापारी मतदारसंघातून चार उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी 1 हजार 719 मतदार आहेत. मुंबई बाजार क्षेत्रातील कांदा, बटाटा व लसणाचे व्यापारी या मतदारसंघातून तीन उमेदवार मैदानात असून 833 मतदार या मतदारसंघात आहेत. या निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर मतदान केंद्र देण्यात आले असून शनिवारी सकाळी आठ ते पाच या वेळेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com