ब्रेकिंग: बार्शी तालुक्यातील जवान जम्मू काश्‍मीर खोऱ्यात हुतात्मा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये पूलवामा विभागातील बंडजु या भागांमध्ये भारतीय जवान आणि अतिरेक्यांच्यात चकमकीत भारतीय जवान हुतात्मा झाला आहे. तो जवान बार्शी तालुक्यातील पानगावमधील आहे. सुनील काळे असे नाव या जवानाचे असून ते केंद्रीय राखीव संरक्षण दलात कार्यरत होते.

वैराग (सोलापूर) : जम्मू काश्मीर खोऱ्यामध्ये पूलवामा विभागातील बंडजु या भागांमध्ये भारतीय जवान आणि अतिरेक्यांच्यात चकमकीत भारतीय जवान हुतात्मा झाला आहे. तो जवान बार्शी तालुक्यातील पानगावमधील आहे. सुनील काळे असे नाव या जवानाचे असून ते केंद्रीय राखीव संरक्षण दलात कार्यरत होते.
सुनील काळे हे हुतात्मा झाल्याचे समजताच बार्शी तालुक्यात शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,  आज पहाटे जम्मू काश्मीर येथे पुलवामा विभागात बंडजु या गावी काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सीआरपीएफ दलाच्या एका तुकडीने बंडजु परिसर पाहणी करून अतिरेकी दबा करून बसलेल्या ठिकाणी घेराव केला.  अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात आणि भारतीय जवान यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार करण्यात या केंद्रीय राखीव संरक्षण दलाच्या तुकडीसह यश आले. या झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान हुतात्मा झाले, अशी माहिती आज सकाळी प्रशासकीय यंत्रणेने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major of Barshi taluka martyred in Jammu and Kashmir